Santosh Juvekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar : डोळ्यात पाणी अन् अंगावर काटा, 'छावा' चित्रपटातील 'तो' सीन संतोष जुवेकरच्या काळजाला भिडला

Chhaava Movie : 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा' चित्रपटातील मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने आपला चित्रपटाचा अनुभव सांगितला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'छावा' (Chhaava) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक वाद-विवाद सुरू झाले आहेत. मात्र तरी देखील प्रेक्षक चित्रपट पाहण्यास आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटात मराठी कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) पाहायला मिळत आहे. त्याने चित्रपटात रायाजीची भूमिका साकारली आहे. नुकताच मिडिया मुलाखतीत संतोषने चित्रपटाचा अनुभव सांगितला आहे. राजश्री मराठीने घेतलेल्या मुलाखतीत संतोषला प्रश्न करण्यात आला की,'छावा' चित्रपटात असे अनेक सीन असतील जे करताना अंगावर काटा आला असेल, असा कोणता अनुभव सांगशील?

संतोष जुवेकर उत्तर देत म्हणाला की, संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीन भारी शूट करण्यात आला. गाणे संपल्यावर जो सीन सुरू होतो, तो भन्नाट आहे. तो सेट पाहून मी वेडा झालो. राज्याभिषेकासाठी रायगडाचा जो सेट उभारण्यात आला होता. सभामंडप, सिंहासन पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. जेव्हा विकीची सेटवर एन्ट्री होते आणि शिवगर्जना ऐकू येते. तेव्हा ती जबरदस्त पावर प्रत्येकाला फील झाली. तेव्हा अस झालं की, ती महाराजांची पावर सेटवर निर्माण होते."

'छावा' चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळत आहे. मराठी अभिनेता संतोष जुवेकर आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहेत. त्याचे मोरया, झेंडा, फक्त लढ म्हणा आणि रेगे हे चित्रपट खूप गाजले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT