Pushkar jog Saam tv
मनोरंजन बातम्या

Pushkar Jog: चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पुष्कर जोग झाला होता जखमी, दुखापतीनंतर लवकरच सुरू होणार मुंबईत शुटिंग

Pushkar Jog News: मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog). पुष्कर जोग अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पुष्कर जोग सध्या 'धर्मा- दी एआय स्टोरी' (Dharma-The Ai story) या चित्रपटाचे शुटिंग करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog). पुष्कर जोग अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पुष्कर जोग सध्या 'धर्मा- दी एआय स्टोरी' (Dharma-The Ai story) या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पुष्करला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले आहे.

पुष्कर जोगने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत त्याला चित्रपटाचे शुटिंग करताना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले होते. धर्मा- दी एआय स्टोरी या चित्रपटाचे शुटिंग स्कॉटलँडमध्ये सुरु होते. स्कॉटलँडमध्ये एक अॅक्शन सीन करताना त्याला दुखापत झाली होती.या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. यावेळी पुष्करच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली होती. यानंतर आता या दुखापतीनंतर पुष्कर पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटिंगसाठी तयार झाला आहे.

पुष्कर जोग दुखापतीनंतर पुन्हा एकदा मुंबईत परतला असून नव्या उत्साहात चित्रपटाचे शुटिंग करणार आहे. पुष्करच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या 'धर्मा- दी एआय स्टोरी' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. एआयच्या जगात आपल्या मुलीला शोधण्याची धडपड करणारा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CancerAwareness : कर्करोग परत होण्याची शक्यता जास्त कधी असते? जाणून घ्या उपचार आणि बचावाचे मार्ग

Akola : पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Manoj Jarange: बीडमधून जरांगेंची तोफ धडाडणार, आज निर्णायक सभा; नेमकं काय बोलणार?

मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कारने आधी संरक्षण भिंत तोडली, पुलावरून थेट खड्ड्यात पडली, तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT