Priyadarshan Jadhav News Instagram
मनोरंजन बातम्या

Priyadarshan Jadhav Interview: ‘इतकी धावपळ करूनही मी वेळेत...’ प्रियदर्शन जाधवने सांगितला ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ नाटका दरम्यानचा किस्सा

Priyadarshan Jadhav News: मुलाखती दरम्यान अभिनेत्याने ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या नाटकादरम्यानची एक आठवण चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Chetan Bodke

Priyadarshan Jadhav News: अभिनेता प्रियदर्शन जाधव नेहमीच आपल्या विनोदी शैलीसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. एक उत्तम अभिनेता, उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्याच्या चाहत्यांमध्ये तो प्रसिद्ध आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ मधून त्याने सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली. नुकताच अभिनेत्याने ‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. त्याने ‘त्याची गोष्ट’ नावाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मुलाखती दरम्यान अभिनेत्याने ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या नाटकादरम्यानची एक आठवण चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

नाटकादरम्यानची आठवण सांगताना प्रियदर्शन जाधव म्हणतो, “१ जानेवारी २००७ला नागपूरमध्ये ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, निर्मिती सावंत आणि मी आम्ही तिघेही नागपूरला विमानाने जाणार होतो. निर्मात्यांचे आणि निर्मिती ताईचे एकाच विमानात तिकीट होते, तर माझं एकट्याचं एका वेगळ्या विमानात तिकीट होतं. आमच्या आधीच नाटकाची बस सर्व सामान घेऊन पुढे निघाली होती. मला त्या नाटकात रिप्लेसमेंट म्हणून काम करायचं होतं.”

प्रियदर्शन पुढे मुलाखतीत म्हणतो, “नाटकाच्या आदल्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबरच्या रात्री मी खूपच दारू प्यायलो होतो. आणि दुसऱ्या दिवसाचं सकाळचं ७ चं विमान माझं चुकलं. म्हणून मी १०च्या विमानाचं तिकिट केलं.पण ते काही कारणामुळे संध्याकाळी ४ वाजता निघणार होते. ते विमान पकडून मी नागपूरमध्ये ५:३० वाजता पोहोचलो. पण तिथूनही जवळपास २५० किमीचा प्रवास शिल्लक होता. इतकी धावपळ करूनही मी वेळेत पोहोचू शकलो नाही. मी वेळेत पोहोचू न शकल्याने अशोक नावाच्या म्युझिक ऑपरेटरने माझी भूमिका केली. सहाजिकच नंतर मला नाटकातून काढण्यात आलं.” (Marathi Actors)

“त्या धावपळीतून मी खूप मोठी गोष्ट शिकलो. माझ्यासोबत पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची मी काळजी घेतली. माझ्याकडून ही इतकी मोठी घोडचूक झाले, याचे मला वाईट वाटले. पण आता ही आठवण पुसून टाकावीशी वाटते.” असं प्रियदर्शन मुलाखतीत म्हणाला. प्रियदर्शनने आतापर्यंत अनेक नाटकांत काम केले आहे. ‘काटा किर्रर्रर्र’ या चित्रपटातून प्रियदर्शन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याची हत्या, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

Maharashtra Rain Live News : - अनिलकुमार पवार, वाय एस रेड्डी, सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Crime : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कट

Thane Water Supply : ठाण्यात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा, कारण काय?

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT