Prathamesh Parab SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab : रहस्य, कॉमेडी अन् भरपूर ड्रामा; प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा धमाकेदार टीझर, पाहा VIDEO

Gaadi Number 1760 Teaser : मराठी अभिनेता प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या 'गाडी नंबर १७६०' (Gaadi Number 1760 Teaser) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसतेय. सुरुवातीलाच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग अचानक गायब होते आणि तिथून सुरू होतो रहस्याने भरलेला आणि विनोदाने सजलेला प्रवास.

'गाडी नंबर १७६०' चित्रपटात बॅगेच्या शोधात अनेक जण एकमेकांवर संशय घेताना, गोंधळात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे रहस्य वाढतेय तर दुसरीकडे संवाद आणि प्रसंगांमधून विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. ही बॅग नेमकी कुठे गेली? हे ४ जुलैला चित्रपटगृहात पाहायला मिळेल. 'गाडी नंबर १७६०' चित्रपट ४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'गाडी नंबर १७६०' स्टार कास्ट

'गाडी नंबर १७६०' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यात प्रथमेश परब (Prathamesh Parab ) , शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे उत्तम कलाकार आहेत. प्रत्येक पात्राची एक गूढ बाजू आहे आणि ती पडद्यावर उलगडताना या कलाकारांचा अभिनय चित्रपटाला अधिकच मनोरंजक बनवतो.

'गाडी नंबर १७६०' चित्रपटात विनोद, रहस्य, मिस्ट्री, ड्रामा सर्वकाही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाचे निर्मिती कैलाश सोराडी आणि विमला सोराडी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT