Prathamesh Parab Hoy Maharaja Film Announce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hoy Maharaja Film Announcement: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दगडुने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा, 'होय महाराजा'चं मोशन पोस्टर रिलीज

Prathamesh Parab Announce New Film: ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’ सह अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रथमेशने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारा अभिनेता लवकरच चाहत्यांच्या भेटीला नव्या चित्रपटांतून येणार आहे.

Chetan Bodke

Prathamesh Parab Hoy Maharaja Film Announce

‘टाईमपास’ चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रथमेश परब ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे कमालीचा चर्चेत आलेला. (Marathi Actors)

सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आलेला आहे. ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘टाईमपास ३’ सह अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रथमेशने चाहत्यांच्या मनात निर्माण घर केले आहे. अशातच लवकरच आणखी एका नव्या चित्रपटातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली. (Marathi Film)

मराठी चित्रपटांचाही चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कायमच प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळे आशय असणारे चित्रपट येत असतात. नुकतंच 'होय महाराजा' असं शीर्षक असलेला, एका पेक्षा एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या चित्रपटाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट रसिकांचे संपूर्ण पैसे वसूल मनोरंजन करेल, यामध्ये शंका नाही. या चित्रपटाच्या रूपात एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Social Media)

एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी 'होय महाराजा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब 'होय महाराजा' म्हणत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

करियरच्या सुरुवातीपासून प्रथमेशनं साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार, अद्याप हे गुलदस्त्यात आहे. क्राईम-कॉमेडी असलेला हा चित्रपट एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला आहे. एक सर्वसामान्य तरुण आपल्या प्रेमाखातर कशा प्रकारे लढा देतो याची रोमांचक कहाणी 'होय महाराजा'मध्ये पाहायला मिळणार आहे. (Marathi Film Industry)

चित्रपटात प्रथमेशसोबत अंकिता लांडे ही अभिनेत्री दिसणार आहे. याखेरीज अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'होय महाराजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी केलं आहे. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचं संगीत लाभलं आहे. चित्रपट येत्या मे २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT