मराठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज (1 जानेवारी)ला वाढदिवस (Birthday) आहे. आता ते 74 वर्षांचे झाले आहेत. गेले अनेक वर्षांपासून नाना पाटेकर हे प्रेक्षकांचे आपल्या अभिनयाने मनोरंजन करत आहेत. नाना पाटेकर कायमच साधे आयुष्य जगत आले आहेत.
नाना पाटेकर यांचा साधेपणा चाहत्यांना खूप आवडतो. ते अनेक बऱ्याच वेळा शेती करताना पाहायला मिळतात. तसेच ते अनेक वेळा गरजूंना मदत करतात. नाना पाटेकर हे एक स्पष्ट वक्ता आहे. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपट केले आहेत. तसेच त्यांनी दमदार नाटकही केली आहेत.
अभिनेता नाना पाटेकर यांचे मुंबईत अलिशान घर आहे. ज्या घराची किंमत तीन कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे लग्जरी कार देखील आहेत. नाना पाटेकरांचा पुण्यातील खडकवासला येथे फार्महाउस आहे. येथे ते शेती करतात. ते कायमच शेतकऱ्यांना मदत करताना पाहायला मिळतात.
मराठीचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर एका सिनेमासाठी 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेतात. तसेच ते जाहिरातीसाठी 1 कोटी रुपये घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती जवळपास 80 कोटी रुपये आहे. त्यांनी अनेक कॉमेडी चित्रपट देखील केले आहेत. तसेच ते गंभीर विषयही खूप उत्तम पद्धतीने हाताळतात.
नाना पाटेकर हे सुरुवातीच्या काळात खूप हलाखीची परिस्थिती राहीले आहेत. वयाच्या १३व्या वर्षी नाना सिनेमाचे पोस्टर्स पेंट करण्याचे काम करायचे. लहानपणापासून नाना पाटेकर यांना अभिनयाची आवड होती.आजवरच्या कारकिर्दीतील नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' चित्रपट खूप गाजला. त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.