Lalit Prabhakar-Prajakta Mali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lalit Prabhakar-Prajakta Mali: आदित्य-मेघनाची 'जुळून येती रेशीमगाठी' पुन्हा येतेय भेटीला?, ललित प्रभाकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

Julun Yeti Reshimgathi Serial: ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lalit Prabhakar Post:

मराठी मालिकाविश्वातील सर्वात जास्त लोकप्रिय जोडी म्हणजे ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी. ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली, असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी मालिकेतील आदित्य-मेघनाच्या जोडीला डोक्यावर घेतले होते. मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली असून या मालिकेचा दुसरा भाग येणार का? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रेक्षक अजूनही मेघना- आदित्यच्या जोडीला खूप प्रेम देत आहेत. मालिकेतील कलाकारांची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळेच मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.

ललित प्रभाकरने सोशल मीडियावर प्राजक्ता माळीसोबतचे फोटो पोस्ट केले आहे. 'काढायचा का दुसरा भाग ? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा)' असं कॅप्शन दिले आहे. ललितच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ही जोडी पुन्हा एकत्र दिसावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

एका युट्यूब चॅनलला 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेच्या संपूर्ण टीमने मुलाखत दिली आहे. त्यानिमित्त ललितने प्राजक्तासोबत फोटोशूट केले आहे. त्यामुळे मालिकेचा दुसरा भाग येणार का? याची उत्सुकता लागली आहे.

जुळून येती रेशीमगाठी मालिकेला १० वर्ष पूर्ण

झी मराठीवर २०१३ साली जुळून येती रेशीमगाठी मालिका सुरू झाली होती. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत असलेल्या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होती. आदित्य- मेघनाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: रमीला ऑलम्पिकमध्ये मान्यता मिळणार; कोकाटेंना क्रीडा खातं मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा चिमटा|VIDEO

Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

2025 Raksha Bandhan: 9 ऑगस्ट रक्षाबंधनच्या ओवाळणीचा शुभ मुहूर्त काय? वेळ, महत्व आणि खास मंत्र घ्या जाणून

FIR Against Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविरोधात पोलिसांत गुन्हा; जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Maharashtra Live News Update : - इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला लागली आग

SCROLL FOR NEXT