Lalit Prabhakar Instagram/ @lalit.prabhakar
मनोरंजन बातम्या

Lalit Prabhakar: ललितला एकटेपणात सुख वाटतं, सोशल मीडियावर रोखठोक मत

सनी चित्रपटातील त्याच्या लूकची सर्वत्रच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो फोटो आणि कॅप्शनमुळे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सोबतच त्याच्या चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्याचा आगामी चित्रपट सनी. सनी चित्रपटामध्ये तो परदेशात एकटा राहायला गेला असल्याचे दाखवले आहे. बऱ्याचदा त्याच्या प्रेक्षकांना गोंधळात टाकणाऱ्या पोस्टवरुन चर्चा होत असते. सनी चित्रपटातील त्याच्या लूकची सर्वत्रच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो फोटो आणि कॅप्शनमुळे.

पोस्टमध्ये फोटोच्याखाली 'Alone is what I have. Alone protects me.' अशा आशयाचे त्याने कॅप्शन दिले आहे. त्याच्या या कॅप्शनने अनेक मराठी कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया फोटोखाली नोंदवल्या आहेत. त्यात सनी चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने 'शेरलॉक'ची उपमा दिली आहे. खरं तर ललित प्रभाकरच्या सनी सिनेमाची कथा घरापासून लांब राहणाऱ्याची कथा सांगत आहे. चित्रपटात सनी परदेशात गेल्यावर पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची भावना सिनेमातून दाखवण्यात आली आहे.

'लांब गेल्यावरच जवळच सापडतं.' या वाक्याचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटात दिसणार आहे. सनीच्या मनात चाललेली ही चलबिचल कोणत्या कारणास्तव आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे. सनीला चित्रपटातील एकटेपणा बोचत असल्याचे सांगितले होते, पण त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातील चित्र काही तरी वेगळेच आहे. त्याला प्रत्यक्ष आयुष्यात एकटेपणात सुख असल्याचे तो सांगत आहे. पण या एकटेपणातून त्याला सुरक्षितता भासत असल्याचेही त्याने सांगितले.

त्याच्या या एकटेपणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र त्याच्या पोस्टचे कारण अद्याप तरी अस्पष्टच आहे. त्याच्या या पोस्टने तरुणींना धक्का बसला असेल हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT