Hardik Joshi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lockdown Lagna: 'काका मला वाचवा...', अभिनेता हार्दिक जोशी असं का म्हणतोय?

Hardik Joshi Movie: आता हार्दिक जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक जोशीच्या या चित्रपटाचे नाव आहे 'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna).

Priya More

Lockdown Lagna Movie:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती. या मालिकेमध्ये राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने (Hardik Joshi) साकारली होती. या मालिकेतूनच हार्दिक जोशी (Actor Hardik Joshi) घराघरामध्ये पोहचला आणि त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर हार्दिक जोशी अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिसला. आता हार्दिक जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक जोशीच्या या चित्रपटाचे नाव आहे 'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna).

अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर 'लॉकडाऊन लग्न'  या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात ते काका-पुतण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. हार्दिक जोशी या चित्रपटामध्ये 'काका मला वाचवा' असे म्हणत आहे. त्याचे काका त्याच्यासोबत नेमकं काय करतात? आणि तो असं का म्हणतो? हे तुम्हाला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच म्हणजे ८ मार्चला कळेल. 

हार्दिक जोशीने आपल्या आगामी 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये हार्दिक लग्नाचा पोषाख आणि फेटा बांधून लग्नासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. या पोस्टरसोबत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जिममध्ये घडलो, प्रेमात पडलो, झाला सगळा घोटाळा... सुखासुखी पार पडेल का हार्दिकचा लग्नसोहळा? लॉकडाऊन लग्न ८ मार्च रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!' त्याच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

अमोल कागणे प्रस्तुत 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं स्पष्ट होतं आहे. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्यानं काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.

हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हार्दिक जोशी  'काका मला वाचवा' अशी साद सुनील अभ्यंकर यांना का घालत आहे याचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला थोडेच दिवस थांबावं लागणार आहे.  

दरम्यान, अमोल कागणे यांच्या 'हलाल', 'भोंगा', 'लेथ जोशी' या चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल १८ पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते 'लॉकडाऊन लग्न' ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात कलाकार कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT