Atul Parchure  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Atul Parchure : 'आपण समोरच्यासाठी काय आहोत…' अतुल परचुरे यांचा 'तो' VIDEO होतोय व्हायरल

Atul Parchure Life Lessons Thought: मराठी अभिनेता अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड झाले. मात्र त्यांचे विचार आजही लोकांना जीवनाचा मार्ग दाखवत आहेत.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाचा लाडका अभिनेता अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे काल (14 ऑक्टोबर 2024) निधन झाले. अतुल परचुरे यांनी कायमच लोकांना हसवण्याचे काम केलं आहे. वयाच्या ५७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी कायमच आपल्या बोलण्याने आणि कामाने लोकांना प्रेरित केले आहे.

मराठी सिनेसृष्टी आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या अतुल परचुरे यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खूप खास होता. ते कायम अनेक मुलाखतींमध्ये आयुष्याबद्दल असे काही बोलून जात असे की, माणसाला विचार करायला भाग पडायचा किंवा अनेक वेळा जगण्याला नवीन दृष्टी मिळायची. असाच एक अभिनेता अतुल परचुरे यांचा आयुष्याबद्दल बोलणार एक व्हिडिओ सोशल मिडिया व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अतुल परचुरे म्हणतात की, "आपण समोरच्या साठी काय आहोत किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं पण खूप गरजेचं असतं" कारण "तुम्ही एखाद्याला तुमचा जिवलग मित्र समजता मात्र तो तुम्हाला फक्त टाईमपास समजत असेल आणि तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी कायम धावून जात असाल तर याचा काही उपयोग नाही. कारण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे आपल्या आयुष्यातील लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते तेव्हा तो आयुष्यातील इतर व्यक्तींना निवडतो किंवा भेटतो. तेव्हा असं वाटतं की आपलं काही तरी चुकलं आहे. समोरच्यासाठी आपण काय आहोत हे माहित असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. "

अतुल परचुरे यांचा निधनानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अतुल परचुरे हे कॅन्सरच्या आजराशी झुंज देत होते. अतुल परचुरे यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमात काम केलं आहे.त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT