Bhau Kadam  Instagram/@bhaukadamofficial
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam |भाऊ कदम पुन्हा एकदा खळखळून हसवायला सज्ज; 'या' चित्रपटात दिसणार

भाऊ कदम आता एक नवा सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भाऊ कदमने सोशल मीडियावर या सिनेमाविषयी पोस्ट शेअर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मराठी कलाविश्वात विनोदी शैलीने अभिनेता भाऊ कदम रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमात त्याने अनेक व्यक्तिरेखा, भूमिका साकारल्या आहेत. भाऊ कदमच्या (Bhau Kadam) अभिनयचा मोठा चाहता वर्ग आहे. आता लवकरच भाऊ कदम हटक्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊ कदम आता एक नवा सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भाऊ कदमने सोशल मीडियावर या सिनेमाविषयी पोस्ट शेअर केली आहे. (Bhau Kadam New Movie news In Marathi )

भाऊ कदमने याआधी देखील अनेक सिनेमातून (Movie) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर आता भाऊ कदम पुन्हा एकदा हसवायला सज्ज झाला आहे. भाऊ कदमने इन्स्टाग्राम अकाउंटवर सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. भाऊ कदम पोस्टर शेअर करण्याबरोबर कॅप्शनही दिले आहे. 'धम्माल एंटरटेनमेंटचा डब्बल बार, सर्व टेंशन्सवर करणार डब्बल वार! तुम्हाला खळखळून हसवायला घेऊन येत आहोत भाऊ कदमच्या कॉमेडीचा डब्बल धमाका, 'घे डब्बल' ३० सप्टेंबर पासून सर्व चित्रपटगृहात". असे लिहिले आहे.

कॉमेडी स्टार भाऊ कदम लवकरच निखळ मनोरंजन करणाऱ्या कौटुंबीक चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे नाव 'घे डबल' असे आहे. भाऊ कदमच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. अलीकडेच,जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मितकडून या आधीच 'घे डबल' या चित्रपटाचा भन्नाट टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे अभिनेते चाहत्यांना हसवायला सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. चित्रपटाची धुरा दिग्दर्शन विश्वास जोशी हे संभाळत असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

भाऊ कदमचा 'पांडू' हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. बाॅक्स आॅफिसवर त्याच्या या चित्रपटाने अनेक रेकॅार्ड मोडले आहेत. आता भाऊ कदमचा ३० सप्टेंबरला नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. भाऊ कदमचा हा आगामी चित्रपट काय जादू करतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT