ashok saraf Saam tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf News: पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही; अशोक सराफ असे का म्हणाले?

'पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही', असं म्हणत बाईपण भारी देवा सिनेमाच्या निमित्ताने परखड भाष्य केलं

Vishal Gangurde

Ashok Saraf News: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. बाईपण भारी देवा' या सिनेमाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटावर सोशल मीडियावर भरभरून बोललं जात आहे. या चित्रपटानंतर सुरु झालेल्या चर्चेवर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने 'पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही', असं म्हणत परखड भाष्य केलं. (Latest Marathi News)

अशोक सराफ काय म्हणाले?

'बाईपण काय भारी हे दाखवायला लोक पुढे येतील. पण पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही. पुरुषांचं भारीपण हे नकळत ठरलं जातं. ते फक्त जाणवून घेण्यापर्यंत असतं. त्याचा कोणही गवगवा करत नाही, असे अशोक सराफ म्हणाले. (Ashok Saraf Latest News)

'स्त्रिया आपल्या मनातल्या भावना दु:ख मैत्रिणी किंवा नवऱ्यासमोर बोलून मोकळ्या होतात. पण पुरुष मंडळी कायम मौन बाळगून असतात. पुरुष त्यांचं दु:ख कधीच कोणासमोर मांडत नाही. कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून त्रासाला सामोरे जातात, असे अशोक सराफ पुढे म्हणाले.

दरम्यान, अशोक सराफ यांचे वक्तव्य सध्या चांगलं चर्चेत आहे. अशोक सराफ यांच्या वक्तव्यावर स्त्रियांही भरभरून बोलत आहेत. तसेच अशोक सराफ यांनी अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात मोठं स्थान निर्माण केलं आहे.

दरम्यान, अशोक सराफ यांनी वयाचे पंचाहत्तर वर्षे पूर्ण केले आहे. तरीही आज अशोक सराफ प्रेक्षकांची सेवा करत आहे. आजही अशोक सराफ हे 'व्हॅक्यूम क्लीनर' नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशोक सराफ यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत या प्रमुख भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT