Ashok Saraf SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'जीवन गौरव पुरस्कार', पाहा PHOTOS

Ashok Saraf Jeevan Gaurav Puraskar : मराठी मनोरंजन सृष्टीचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना 'नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सुंदर क्षणाचे फोटो पाहा.

Shreya Maskar

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. कोणतीही भूमिका असो त्यांनी ती खूपच सुंदर रित्या निभावली आहे. त्यांच्या कामाची पावती त्यांनी नेहमीच मिळत राहिली आहे. त्यात आता एक नवीन भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेने 'नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार' (Natsamrat Balgandharva Jeevan Gaurav Puraskar) प्रदान करण्यात आला आहे. नाट्य व चित्रपट सृष्टीत मोलाची कामगिरी केलेल्या लोकांना 'नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येते. आजवर अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

पुरस्कारानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी प्रेक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तसेच पुरस्कारासाठी आभारही मानले. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत यांना देखील नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

'नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार 2024' हा सोहळा शुक्रवार (29 नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी पार पडला. हा सोहळा विले पार्ले मुंबई येथे पार पडला. अनेक मोठे कलाकार या सोहळ्याला उपस्थितीत होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, गायक सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

SCROLL FOR NEXT