संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये मानल्या जाणाऱ्या 'ग्रॅमी पुरस्कार २०२४'ची घोषणा करण्यात आली आहे. ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताला काही अवॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोबतच यावेळी बासरीवादक राकेश चौरसिया यांनाही ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Bollywood)
शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या 'शक्ती' बँडच्या 'दिस मोमेंट' या अल्बमला 'सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम'चा किताब मिळाला आहे. तर बासरीवादक राकेश चौरसिया यांनाही 'सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम'च्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
क्रिप्टो डॉट कॉम एरिना, लॉस एंजेलिसमध्ये ६६ व्या ग्रॅमी पुरस्कारांचे सोमवारी, ५ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आला होता. संगीत उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. प्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रेव्हर नोआ याने सलग चौथ्यांदा ग्रॅमी पुरस्काराची होस्टिंग केली आहे. (Bollywood News)
शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या 'शक्ती' बँडच्या 'दिस मोमेंट' या अल्बमला 'सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम'चा किताब मिळाला आहे. या बँडने 45 वर्षांनंतर आपला पहिला अल्बम रिलीज केला, ज्याला थेट ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या म्युझिक बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसेन, व्ही सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन सारखे दिग्गज कलाकार आहेत. १९७७ नंतर हा बँड फारसा सक्रिय नव्हता. १९९७ मध्ये जॉन मॅक्लॉफलिनने त्याच संकल्पनेवर पुन्हा 'रिमेम्बर शक्ती' नावाचा बँड तयार केला.
त्या बँडमध्ये व्ही. सेल्वागणेश (टी.एच. 'विक्कू' विनायकरामचा मुलगा), मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांचा समावेश होत. २०२० हे सर्व कलाकार पुन्हा एकत्र येत, ४६ वर्षांनंतर 'दिस मोमेंट' अल्बम रिलीज केला. अवघ्या काही दिवसांतच या अल्बमला प्रसिद्धी मिळाली असून यामध्ये एकूण ८ गाणे आहेत. (Singer)
ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तबलावादक झाकीर हुसेन यांनी इतिहास रचला आहे. झाकीर हुसेन यांनी तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावावर कमावले आहेत. सोबतच आपल्या सुंदर बासरी वादनासाठी ओळखले जाणारे भारताचे राकेश चौरसिया यांनीही दोनदा ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. यापूर्वी भारतीय गायक शंकर महानदेवन यांना पोश्तो गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.