Amol Kolhe SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amol Kolhe : "यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..."; IndiGo एअरलाइनचा सावळा गोंधळ पाहून अमोल कोल्हे संतापले

Amol Kolhe On IndiGo Airlines : मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांना इंडिगो एअरलाइनचा धक्कादायक अनुभव आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी याची माहिती दिली आहे.

Shreya Maskar

इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

अमोल कोल्हे यांनी इंडिगो एअरलाइनवर नाराजी व्यक्त केली आहे.

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला अनुभव सांगितला आहे.

इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन 'पायलट ड्युटी टाईम लिमिटेशन्स' नियमांमुळे इंडिगोला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. इंडिगो एअरलाइन्सची ५५० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद एअरपोर्टवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. कंपनीने १० फेब्रुवारीपर्यंत या नियमात सवलत मिळावी, अशी मागणी डीजीसीआयकडे केली आहे.

इंडिगोच्या या कारभारावर आता मराठी अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी देखील इंडिगो एअरलाइनवर आपली नजारी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये दोन फोटो आणि दोन व्हिडीओ शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये अभिनेते फ्लाइटची वाट पाहत बसलेले पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये या गोंधळाच्या काळात आपले काम करताना दिसत आहेत.

अमोल कोल्हे यांची पोस्ट

अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "देशांतर्गत विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल...! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या 'निवांत वेळेत' एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं... ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती...यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच...! जय शिवराय "

सरकारकडून इंडिगोला तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंडिगोच्या फ्लाइटचे उड्डाण रद्द झाल्यामुळे तिकीट दरात मोठी वाढ झाली असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच विमानतळावर गर्दी वाढताना दिसत आहे. संतप्त प्रवाशांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांशी वाद घाताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT