Juna Furniture Poster Out Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Juna Furniture: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मध्ये दिसणार हे कलाकार, नव्या पोस्टरसोबत पाहा स्टारकास्टची लिस्ट

Juna Furniture Poster Out: सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली.

Priya More

Juna Furniture Movie:

मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी काही दिवसांपूर्वी 'जुनं फर्निचर' (Juna Furniture Movie) या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचा टीजर देखील त्यांनी लाँच केला होता. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. टीझरवरून या चित्रपटामध्ये महेश मांजेकर हे मुख्य भूमिकेमध्ये असणार हे स्पष्ट झाले होते. पण त्यांच्यासोबत या चित्रपटामध्ये आणखी कोण-कोण कलाकार काम करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्ये महेश मांजरेकर यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरसोबत कलाकारांची नावं सांगितली आहेत.

सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं देखील समोर आली आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत. ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळणार आहेत.

या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

महेश मांजरेकर यांनी चित्रपटाबद्दल सांगितले की, 'जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील. परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा. जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT