Mahesh Manjarekar Juna Furniture Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Juna Furniture Teaser: 'या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!, महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'ची घोषणा

Priya More

Juna Furniture Movie:

मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असतो. महेश मांजरेकर हे नेहमी चांगल्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि ते सुपरहिट देखिल ठरतात. नुकताच महेश मांजरेकर यांचा अनोखी गाठ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर महेश मांजरेकर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. नुकताच त्यांनी 'जुनं फर्निचर' (Juna Furniture Movie) या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचा टीजर लाँच इव्हेंट नुकताच पार पडला.

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टीजर लाँच करण्यात आले. यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला.

यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत. महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. 'या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !', या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा असल्याचे दिसून येत आहे.

टीजरमधील महेश मांजरेकर यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवतो. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे 'ओल्ड फर्निचर' वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर असलेला हा एका कौटुंबिक चित्रपट आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, 'हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा 'ओल्ड फर्निचर' म्हणजेच 'जुनं फर्निचर'. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली 'जुनं फर्निचर' म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना 'जुनं फर्निचर'बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT