Kushal Badrike SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike : एक Click; बायकोसाठी कुशल बनला फोटोग्राफर, केलं खास फोटोशूट

Kushal Badrike Video : मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या बायकोचे फोटोशूट करताना दिसत आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) कायम त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. कुशल बद्रिके सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या आयुष्याचे अपडेट तो कायम चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकतीच कुशलने एक खास पोस्ट केली आहे.

कुशल बद्रिकेच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या पोस्टमधूनही कुशल चाहत्यांना हसवत आहे. त्याने सोशल मीडियावर कुटुंबासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट त्याने बायकोसाठी केली आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, कुशल बद्रिकेने स्वतः आपल्या बायकोचे सुंदर फोटोशूट केले आहे. एक फोटोशूटसाठी घेतलेली मेहनत त्यांनी त्या व्हिडीओतून दाखवली आहे. एक clickसाठी कुशल तारेवरची कसरत करताना पाहायला मिळत आहे.

कुशल बद्रिके पोस्ट

"माणसाला आयुष्यात सुखाचा क्षण वेचता आला नाही तरी चालेल पण बायकोने सांगितल्यावर तिचा छानसा फोटो मात्र खेचता आला पाहिजे. सुखाचा संसार हा आपल्या नशिबात असला तरी click होईलच असं नाही. ते बऱ्याचदा camera मधे केलेल्या click वर सुद्धा depend करतं. मला छान फोटो काढायला जमतील हा शोध माझ्या बायकोने लावलाय . ह्या वरून असे सिद्ध होते की बऱ्याचदा "भीती" सुद्धा शोधाची जननी असू शकते आणि ह्या निकषावर माझ्या मुलाचा संसार सुद्धा छान होईल असा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय!"

कुशल बद्रिकेने व्हिडीओ पोस्ट करून त्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या शेवटी मात्र कुशल बायकोचे सुंदर फोटो काढल्याचे दिसून येत आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये मजा मस्ती पाहायला मिळत आहे. फोटोशूटसाठी कुशल बद्रिकेच्या बायकोने छान गाऊन परिधान केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT