Amey Wagh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amey Wagh : सबसे कातील गौतमी पाटीलसोबत बेफाम होऊन नाचला, अमेय वाघनं सांगिताल खास अनुभव!

Amey-Gautami : अमेय वाघने गौतमी पाटीलसोबत 'लिंबू फिरवलं' या गाण्यावर डान्स केल्याचा अनुभव सांगितला आहे.

Shreya Maskar

अमेय वाघआणि अमृता खानविलकर यांचा 'लाइक आणि सबस्क्राइब' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. या चित्रपटात अमेय वाघ यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत भन्नाट डान्स केला आहे. तिच्यासोबत डान्स केल्याचा अनुभव अमेयने शेअर केला आहे.

एका मिडिया मुलाखतीत अमेय वाघने गौतमी पाटीलबरोबर डान्स करण्याचा अनुभव सांगितला आहे. अमेय गौतमीबद्दल बोला की," मी या चित्रपटाची कथा आधी ऐकली होती. तेव्हा सर मला बोले की आपल्याला आयटम साँग करायचे आहे. ते आपल्या चित्रपटासाठी साजेसं आहे. या गाण्यासाठी अनेक व्यक्तींच्या नावांचा विचार झाला. तेव्हा गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव समोर आले. त्याक्षणी मी सरांना सांगितले की, गौतमी या गाण्यासाठी परफेक्ट आहे. कारण गौतमीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ती आवडते."

गौतमीचं कौतुक करत अमेय पुढे बोला की, " आम्ही तीन-चार दिवस गाण्याची रिहर्सल केली. मी साडेतीन दिवस तर गौतमीनं फक्त अर्धा दिवस रिहर्सल केली. माझ्यामुळे गाण्याचे अनेक रिटेक्स झाले. त्यामुळे माझ्यामुळे गौतमीला खूप नाचावं लागलं. पण मुख्य गाण्यात मी गौतमीच्या तोडीस तोड नाचलो आहे." यापुढे अमेय एक खास गोष्ट बोलतो. म्हणतो की, "गौतमीच्या चाहत्यांच्या वतीने मी नाचलो आहे. कारण तिच्यासोबत डान्स करायची इच्छा तिच्या प्रत्येक चाहत्यांना आहे. "

'लाइक आणि सबस्क्राइब' या चित्रपटात 'लिंबू फिरवलं' या गाण्यात अमेय आणि गौतमीनं एकत्र भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स चाहत्यांना देखील खूप आवडतो. 'लाइक आणि सबस्क्राइब' हा चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्ध्यात यशोदा नदीला पूर; गावांचा संपर्क तुटला

Crocodile : सांगलीत भर रस्त्यावर मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये पसरली दहशत, रेस्क्यू करत मगरीला पकडले

Nagpur Rain: नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा; शाळांना सुट्टी, जनजीवन विस्कळीत|VIDEO

Success Story: 'फी'साठी आईचे सोनं गहाण ठेवले, मावळचा लेक CA झाला, रिक्षाचलाकाच्या मुलाचा संघर्ष वाचून डोळ्यातून पाणी येईल

Nashik To Nagpur Travel: नाशिकहून नागपूरपर्यंत जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या प्रवासाचे सोपे मार्ग

SCROLL FOR NEXT