Ajinkya Nanaware Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajinkya Nanaware: मालिकांनंतर अजिंक्य ननावरेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'सोंग्या'मध्ये साकारणार लक्षवेधी भूमिका

Ajinkya Nanaware Movie: 'सोंग्या' चित्रपटात अजिंक्य मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो यशराजची भूमिका साकारताना दिसणार आहे. अजिंक्यचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priya More

Ajinkya Nanaware In Songya Movie:

मराठी मालिकांमधील सर्वांचा आवडा आणि लाडका चेहरा म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. एका डॅशिंग अंदाजमध्ये अजिंक्य ननावरे मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. 'सोंग्या' चित्रपटात अजिंक्य मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो यशराजची भूमिका साकारताना दिसणार आहे.

निरामि फिल्म्स प्रस्तुत 'सोंग्या' चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे, राहुल पाटील यांनी केली आहे. मिलिंद इनामदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यादव यांची आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने आजवर अनेक नाटक-मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे. पण 'सोंग्या' मधून अजिंक्य प्रथमच मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अजिंक्यने साकारलेला यशराज हा उच्चशिक्षित असून देखील कुटुंबाची मानमर्यादा आणि समाज यांच्या जाळ्यात कसा अडकत जातो याचं उत्तम दर्शन घडवतो.

कुप्रथांना वाचा फोडणाऱ्या एका संवेदनशील विषयवार भाष्य करणाऱ्या ‘सोंग्या’ या चित्रपटाची कथा खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटामध्ये अजिंक्य ननावरेसोबत ऋतुजा बागवे, गणेश यादव आणि अनिल गवस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर योगेश चिकटगावकर, दिपाली जाधव, अमोल भोसले, अपर्णा काकिर्डे, वैशाली जाधव, श्रद्धा धामणकर, प्रदीप सरवदे, प्रदीप डोईफोडे, आशिष शिर्के हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT