Ajinkya Deo Post For Mother Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajinkya Deo Post For Mother: आईच्या आठवणींमध्ये अंजिक्य देव भावुक, VIDEO शेअर करत म्हणाला - 'सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही'

Ajinkya Deo Instagram Post: सीमा देव यांच्या निधनामुळे देव कुटुंबाला मोठा धक्का बसला. या दु:खातून अद्याप त्यांचे कुटुंब सावरले नाही.

Priya More

Ramesh Deo And Seema Deo Movie:

मराठी मनोरंजन विश्वात (Marathi Film Industry) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर जादू करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Actress Seema Deo) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. २४ ऑगस्टला वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सीमा देव यांच्या निधनामुळे देव कुटुंबाला मोठा धक्का बसला. या दु:खातून अद्याप त्यांचे कुटुंब सावरले नाही. अशामध्ये सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव (Actor Ajinkya Deo) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीमा देव यांच्या निधनानंतर भावुक होत अजिंक्य देव यांनी आईसाठी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आईसाठी सुंदर कविता सादर केली आहे. या व्हिडिओमध्ये अजिंक्य देव असे म्हणतात की, 'भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही.' अजिंक्य देव यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'आई' असं लिहिलं आहे.

अजिंक्य देव यांचा या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'आई सारखे दुसरे दैवत नाही.', 'आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.', 'आई ती आईच असते सर ...', 'बरोबर आहे पण आई वडिलांची किंमत गेल्यावर कळते', अशा प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

सीमा देव यांचे निधन झाल्यानंतर अजिंक्य देव वारंवार आपल्या आई-वडिलांच्या आठवणींमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आई-वडिलांचा सोबतचा हसत असलेला फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'आई-बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्‍त आठवणी… सुंदर गोड आठवणी', असे लिहिले होते.

दरम्यान, अजिंक्य देव आणि सीमा देव हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपल होते. १ जुलै १९६३ साली त्यांचे लग्न झाले होते. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. रमेश देव यांचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर २०२३ मध्ये सीमा देव यांचे देखील निधन झाले. २४ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

Shukra Gochar 2025: ऑक्टोबरमध्ये धनदाता शुक्र ४ वेळा बदलणार रास; 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT