Adinath Kothare Enter In Ramayana Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor च्या 'रामायण'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार प्रभू रामाचे भाऊ भरतची भूमिका

Adinath Kothare Enter In Ramayana Film: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांच्या रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आदिनाथ रामायणमध्ये दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Priya More

Adinath Kothare:

'पंचक' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेची (Adinath Kothare) बिग बजेट बॉलिवूड चित्रपटामध्ये एन्ट्री झाली आहे. नितेश तिवारी (Nitish Tiwari) यांच्या अपकमिंग 'रामायण' (Ramayana Film) चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे दिसणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांच्या रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आदिनाथ रामायणमध्ये दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये रवी दुबे, कैकयीच्या भूमिकेमध्ये लारा दत्ता, श्रुपनखाच्या भूमिकेमध्ये रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभू रामाचे भाऊ भरतच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार यावर चर्चा सुरू होती. अशामध्ये आता भरत हे पात्र मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार आहे.

फिल्मीबीटने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री साक्षी तंवर ही चित्रपटात मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे. इंदिरा कृष्ण ही भगवान रामाची आई कौशल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रभू रामाचे भाऊ भरत हे चित्रपटातील महत्वाच्या भूमिकांपैकी एक आहे. भरतने आपल्या भावाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून राज्य केले होते. भरत नेहमीच एक आदर्श भाऊ होता. आता या चित्रपटामध्ये भरतच्या भूमिकेमध्ये आदिनाथ कोठारे दिसणार आहे. त्यामुळे आदिनाथच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

दरम्यान, आदिनाथ कोठारेने मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्याने 'निळकंठ मास्तर', 'चंद्रमुखी', 'पंचक' या मराठी चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले आहे. आदिनाथने रणवीर सिंगच्या '83' चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याचोसबत त्याने 'सिटी ऑफ ड्रीम्स २', 'क्रिमिनल जस्टीस ३' आणि 'बजाओ' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. आता तो 'रामायण'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT