ओपन शर्ट... हातामध्ये सोन्याची चार घड्याळं, 'Thalaivar 171' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक आऊट

Thalaivar 171 First Look Out: मागच्या वर्षी रजनीकांत यांनी 'जेलर' हा सुपरहिट चित्रपट दिला होता. त्याच वर्षी 'लाल सलाम' या चित्रपटातही ते दिसले होते. आता ते दिग्गज दिग्दर्शक लोकेश कनागराजसोबत त्याचा आगामी चित्रपट 'थलायवर 171' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Thalaivar 171 First Look Out
Thalaivar 171 First Look OutSaam Tv

Rajinikanth First Look From Thalaivar 171:

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांचा आगामी 'थलायवर 170' (Thalaivar 170) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ३३ वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. 'मास्टर', 'विक्रम' आणि 'लिओ' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे निर्माते लोकेश कनागराज हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटातील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे स्टायलिश अंदाजमध्ये रजनीकांत दिसत आहेत.

मागच्या वर्षी रजनीकांत यांनी 'जेलर' हा सुपरहिट चित्रपट दिला होता. त्याच वर्षी 'लाल सलाम' या चित्रपटातही ते दिसले होते. आता ते दिग्गज दिग्दर्शक लोकेश कनागराजसोबत त्याचा आगामी चित्रपट 'थलायवर 171' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 'थलायवर 171' ची घोषणा केली होती. नुकताच लोकेशने या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट शेअर केले आहे. त्याने या चित्रपटातील रजनीकांत याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. रजनीकांत यांना स्टायलिश अंदाजमध्ये पाहून चाहते खूश झाले आहेत.

लोकेश कनगराज यांनी रजनीकांत यांच्या 171 व्या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केल्यानंतर ६ महिन्यांनंतर एक मोठे अपडेट शेअर केला आहे. या चित्रपटाचे शीर्षक कधी जाहीर होणार हे दिग्दर्शकाने सांगितले आहे. इतकेच नाही तर या चित्रपटातील रजनीकांत यांचे पहिले पोस्टरही आऊट केले आहे. ओपन शर्ट, काळा गॉगल, हेअरस्टाइल आणि हातामध्ये सोन्याचे चार घड्याळ असा रजनीकांत यांचा लूक आहे. हा लूक पाहून रजनीकांत 73 वर्षांचे आहेत असे वाटणारच नाही.

Thalaivar 171 First Look Out
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाला 'मडगांव एक्सप्रेस'ने टाकले मागे, आतापर्यंतची कमाई किती?

'थलायवर 171' चित्रपटातील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये रजनीकांत यांनी शर्टचे बटण लावले नाहीत, काळा गॉगल घातलेला आणि हातकडीसारखे चार सोन्याचे घड्याळे घातलेले दिसत आहे. रजनीकांत हे स्टायलिश अंदाजमध्ये दिसत आहे. त्याचा स्वॅग पाहता ७३ वर्षीय रजनीकांत या चित्रपटात डॅशिंग व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे अधिकृत शीर्षक 22 एप्रिल रोजी समोर येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश यांनीच केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Thalaivar 171 First Look Out
Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'मधील पहिलं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, 'उधळीन जीव'ला मिळतेय पसंती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com