Abhishek Rahalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Rahalkar : मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर; गुपचूप बांधली लग्नगाठ, अभिषेक रहाळकरची बायको आहे तरी कोण?

Abhishek Rahalkar Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा' फेम अभिनेता अभिषेक रहाळकर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या मनोरंजनसृष्टीत लगीनघाई पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. तर काही कलाकार आपल्या नात्याची कबुली देत आहेत. तर काहींचा साखरपुडा होत आहे. काहींच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. या लग्नसराईत अजून एक अभिनेत्याचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) फेम अभिनेता अभिषेक रहाळकरने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

अभिषेक रहाळकरने (Abhishek Rahalkar) लग्न आणि साखरपुडा दोन्ही समारंभ गुपचूप पण थाटात पार पाडले आहेत. त्याच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिषेकच्या बायकोचे नाव कृत्तिका असे आहे. दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. यांनी लग्नात पारंपारिक लूक केला होता. कृतिकाने (kruttika ) गोल्डन रंगाची साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा आणि मोकळे केस सोडून कृतिका खूप सुंदर दिसत होती.

अभिषेक रहाळकरने लग्नात गोल्डन रंगाची शेरवानी आणि फेटा परिधान केला होता. त्याच्या लग्न समारंभाला अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. सध्या सोशल मीडियावर अभिषेक रहाळकर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिषेक रहाळकरला 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अभिषेकने सार्थक नावाचं पात्र साकारले होते. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. अखेर सार्थक आपल्या खऱ्या आयुष्यातील आनंदीशी लग्नगाठ बांधली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT