Aastad Kale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aastad Kale : "छावा वाईट फिल्म...", आस्ताद काळे असं का म्हणाला? आधी बरळला आता दिलं स्पष्टीकरण

Aastad Kale Talk On Chhaava Movie : "छावा वाईट फिल्म..." असे मराठी अभिनेता आस्ताद काळे म्हणाला होता. अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली होती. आता या पोस्ट मागचे कारण त्याने स्पष्ट केले आहे.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने सर्वांना वेड लावले आहे. 'छावा'ने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल पाहायला मिळाला.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वत्र चित्रपटाचे कौतुक पाहायला मिळाले. मात्र मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) 'छावा' चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करत 'छावा वाईट फिल्म...' असल्याचे बोला होता. मराठी अभिनेता आस्ताद काळेने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या अशा विधानामागचे मत मांडले आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

अलिकडेच मराठी अभिनेता आस्ताद काळेने 'छावा' चित्रपट संबंधित पोस्ट केल्या होत्या. ज्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. आता यावर आस्तादने आपले मत मांडले आहे. आस्तादने पोस्टमध्ये म्हटलं होत की, "'छावा' वाईट चित्रपट आहे" यावर आपले मत मांडत आस्ताद म्हणाला की, मला 'छावा' चित्रपट आवडला नाही हे माझे वैयक्तिक मत आहे.

या बद्दल पुढे आस्ताद म्हणाला की, "महाराजांच्या नऊ वर्षांच्या काळाबद्दल दोन चित्रपट करण्याचा निर्णय तुम्ही का नाही घेतला? सर्व एकाच चित्रपटात का दाखवलं? 'बाहुबली'सारखी काल्पनिक गोष्ट दोन भागात दाखवण्यात आली. मग 'छावा' चित्रपट का नाही दाखवण्यात आला? तुम्ही चित्रपटासाठी खूप कष्ट घ्या. खूप वरवर आणि विषयाच्या खोलात न जाता हा चित्रपट बनवण्यात आला त्यामुळे तो मला आवडला नाही. "

'छावा' चित्रपटातील 'महाराणी सोयराबाई'च्या भूमिकेबद्दल बोलताना आस्ताद म्हणाला की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या पत्नी भर दरबारात परपुरुषांसमोर पान खातात हे कसं शक्य आहे. जे चित्रपटात दाखवलं आहे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT