Hemant Dhome On Marath Reservation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemant Dhome: सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत, मराठा आरक्षणासंदर्भातील हेमंत ढोमेचे ट्वीट चर्चेत

Hemant Dhome Tweet On Manoj Jarange Patil: सरकारने लवकरात लवकर ठोस पाऊलं उचलावीत अशी मागणी हेमंत ढोमेने या पोस्टद्वारे केली आहे.

Priya More

Hemant Dhome On Marath Reservation:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे. सध्या राज्यात हा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे (Manoj Jarange) उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांना आता सर्वच स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेत्यांपासून ते आता सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्यांना पाठिंबा देत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने सोशल मीडियावर जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी पोस्ट केली होती. त्यांचे ट्वीट चर्चेत आले होते. त्यानंतर टीव्ही अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्यासंदर्भात ट्वीट केले आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस पाऊलं उचलावीत अशी मागणी त्याने या पोस्टद्वारे केली आहे.

हेमंत ढोमेनं ट्विटमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये हेमंतने असं लिहिलं आहे की, 'आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!" रितेश देशमुखनंतर आता हेमंत ढोमेचे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

टीव्ही अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोमवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी अश्विनी महांगडेने भेट दिली होती.

त्याचा व्हिडीओ शेअर करत अश्विनीने कॅप्शनमध्ये 'आता नाही तर कधीच नाही...विद्यार्थी ...स्वप्नं...मेहनत...परीक्षा...उत्तिर्ण....यश...तरीही अपयश...मग आक्रोश...यातना...मग परत परीक्षा...मग परत सगळे तेच आधीचे पाढे...आणि मग आत्महत्या....हे गेले किती तरी वर्षे सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे.' अश्विनीची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT