मनोरंजन बातम्या

Manasi Naik : आता काय ICUमध्ये दाखल करतेस का? तोकड्या कपड्यावरून मानसी नाईक ट्रोल

Manasi Naik trolled : तोकड्या कपड्यावरून मानसी नाईक ट्रोल झालीये. मानसीने काही तासांपूर्वी फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मानसी नाईक तिचा लूक आणि फोटोमुळे चर्चेत असते. मानसी नाईकचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो. काही तासांपूर्वीच मानसीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. मानसीने तोकड्या कपड्यातील फोटो शेअर केले आहेत. मात्र, चाहत्यांनी या तोकड्या कपड्यामुळे मानसीला ट्रोल केले आहे. आता काय ICUमध्ये दाखल करतेस का? अशा शब्दात कमेंट करत एका चाहत्याने ट्रोल केले आहे.

मानसी नाईक ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मानसीने २००७ साली मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर मानसी मागे वळून पाहिलं नाही. मानसी तिचा अभिनय, लूक, डान्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मानसीने २०२२ साली प्रदीपसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर मानसी काही वर्षांनी प्रदीप खरेरापासून विभक्त झाली. सध्या मानसी नाईक इन्स्टाग्राम प्रचंड सक्रिय असते. आतापर्यंत मानसी नाईकने साडी आणि ड्रेसवर फोटो शेअर केले आहेत.

आता काही तासांपूर्वी मानसीने शेअर केलेल्या तोकड्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. मानसी ब्रा लेक टॉप आणि शॉर्ट घातले आहे. मात्र, या तोकड्या कपड्यामुळे मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मानसीच्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केले आहेत. काही नेटकऱ्यांना तिचा लूक भावला नाही. 'काय फालतुगिरी आहे, अशी एकाने कमेंट केली आहे. 'सगळ्यात भारी रिक्षावाला गाण्यावरचा लूक एक नंबर... हा मॉर्डन काही क्षणासाठी ओके', असे दुसऱ्याने म्हटलं आहे.

'मानसी आयसीयूमध्ये दाखल करण्याचा विचार आहे का? असा एकाने प्रश्न केला आहे. काहींनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांना लूक आवडला आहे. काही सेलिब्रिटी मंडळींनी देखील हा लूक आवडला आहे. मानसीने शेअर केलेल्या फोटोंना आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत. तसेच आतापर्यंत तिच्या फोटोवर दोनशेहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. शेकडो नेटकऱ्यांनी तिचे फोटो शेअर केले आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्यानंतर मानसी नाईक काय प्रतिक्रिया देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमन करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

SCROLL FOR NEXT