Manoj Bajpayee's New Movie Bandaa Announced  Instagram @bajpayee.manoj
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee's Bandaa Poster: मनोज वायपेयींच्या जन्मदिनी त्याच्या नव्या चियत्रपटची घोषणा; सत्य घटनेवर आधारित 'बंदा'ची घोषणा

Manoj Bajpayee's New Movie Announced: आज मनोज वायपेयीचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी ZEE5 ने अभिनेत्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.

Pooja Dange

Manoj Bajpayee's New Movie Bandaa Poster Out: मनोज वाजपेयी बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनय करणार एक स्टार आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याने सिनेविश्वात नाव कमावले आहे. आज मनोज वायपेयीचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी ZEE5 ने अभिनेत्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट अपूर्व सिंग कार्की यांनी दिग्दर्शित केला आहे. दीपक किंगराणी यांनी लिहिलेला एक पॉवर-पॅक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटाचे नाव 'बंदा' असे आहे. बंदा चित्रपट Zee5 चा खास डायरेक्ट टू डिजिटल चित्रपट आहे.

सायलेन्स कॅन यू हिअर इट... चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मनोज बाजपेयीचा ZEE5 सोबतचा तिसरा OTT चित्रपट आहे. बंदामध्ये मनोज एका प्रसिद्ध वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा वकील एकटा सत्य आणि न्यायासाठी सर्व अडचणींविरुद्ध लढतो.

यादरम्यान मनोज बाजपेयी म्हणाले, 'बंदासाठी ZEE5 सोबतचे माझे तिसरे काम जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. आता आम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक कथा घेऊन येत आहे. मी त्याची प्रतीक्षा करू शकत नाही. ZEE5 वर लवकरच प्रीमियर होणार्‍या 'बंदा'ची आणखी एक झलक सादर करण्यास मी उत्सुक आहे.

अभिनेते मनोज वायपेयी यांनी 'बंदा' चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जेव्हा न्याय देण्याची वेळ येईल तेव्हा एकच व्यक्ती (बंदा) सर्वांना पुरून उरेल. केवळ #ZEE5 वर, सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे साक्षीदार व्हा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Weather Update : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, एकता नगर पाण्याखाली, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Viral Video: पायलटला सलाम! मुंबईच्या मुसळधार पावसात विमानाचे यशस्वी लॅडिंग, थरारक व्हिडीओ पाहिलात का?

Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT