मनोरंजन बातम्या

Manmauji Movie: सायली संजीव आणि भूषण पाटील लावणारं प्रेमाचं 'याड'; या दिवशी मनमौजी होणार प्रदर्शित

Manmauji Teaser Released: अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला "मनमौजी" हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Manasvi Choudhary

तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच... पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या 'मनमौजी' या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला "मनमौजी" हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी "मनमौजी" चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे.

"मनमौजी" म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लुक फार रंजक आहे. मोकळ्या वातावरणात धावत असलेल्या तरुणाबरोबर आजुबाजूच्या तरुणीही धावू लागतात आणि त्याच्या जवळ येतात. पण मनमौजी चित्रपटात तर मुली किंवा बायका न आवडणारा तरुण नायक आहे. त्यामुळे सतत जवळ येणाऱ्या बायकांमुळे त्याचं काय होत असेल याची रंजक गोष्ट या चित्रपटात उलगडणार आहे. सिक्स पॅक अॅब्ज आणि फ्रेश लुक असलेला भूषण पाटील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मनमौजी चित्रपटासाठी आता ८ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहायलाच हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT