Manisha Koirala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Cancer: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

Manisha Koirala: मनीषा कोईरालाने स्टेज ४ ओव्हेरियन कॅन्सरचं निदान झाल्यानंतरची भयावह रात्र आठवली. मृत्यूची भीती, एकाकीपणा आणि उपचारांचा कठीण प्रवास अभिनेत्रीने मनमोकळेपणाने सांगितला.

Shruti Vilas Kadam

Manisha Koirala: बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल पुन्हा एकदा मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. २०१२ मध्ये त्यांना स्टेज ४ ओव्हेरियन कॅन्सरचं निदान झालं होतं. या काळात त्यांनी न्यूयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी घेतली. कॅन्सरचं निदान झाल्याचं समजल्यानंतरची ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात एकाकी आणि भयावह रात्र होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

सुशांत प्रधान यांच्या पॉडकास्टमध्ये झालेल्या संवादात मनीषा यांनी कॅन्सरच्या निदानानंतर अनुभवलेल्या भावनिक वेदनांविषयी सांगितलं. नेपाळमधील नर्व्हिक इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना कॅन्सर झाल्याचं समजलं. ही बातमी समजल्यानंतर त्यांच्यासाठी सगळंच बदलून गेलं.

‘मला वाटलं मी मरणार’

कॅन्सर असल्याचं समजल्यानंतरची रात्र आठवताना मनीषा कोईराला म्हणाल्या की, 'ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि एकाकी रात्र होती. त्या क्षणी मला सर्व काही अंधारात बुडाल्यासारखं वाटत होतं. मला वाटलं की मी मरणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

गंभीर आजाराशी लढताना रुग्णाला किती एकटेपणा जाणवतो, याची जाणीव स्वतःच्या कॅन्सरच्या प्रवासातून झाल्याचंही मनीषा यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आजूबाजूला कितीही लोक असले तरी मनातील एकटेपणा कमी होईलच असं नाही. कधी कधी गर्दीत असूनही व्यक्ती एकटं असल्याचं वाटतं असा अनुभव मी तेव्हा सतत घेत होते.

बॉलिवूड पार्ट्यांमधील अनुभवही त्यांनी शेअर केला. बॉलिवूड पार्ट्यांसारख्या ठिकाणी इतर लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला तरी काही वेळा आपल्याला एकटं वाटत राहतं. माझ्या मते, एकाकीपणा हा आयुष्याचा एक भाग आहे आणि काही वेळा माणूस त्या भावनेसोबत जगायला शिकतो.

सुरुवातीला फूड पॉयझनिंगचा संशय

२०१२ च्या सुरुवातीला मनीषा यांना पोट सतत दुखायचं. सुरुवातीला त्यांना फूड पॉयझनिंग झाल्याचा संशय आला. मात्र, वारंवार पोट फुगणे आणि वजन कमी होणे यांसारख्या समस्या जाणवल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर त्यांना ओव्हेरियन कॅन्सर असल्याचं निदान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

High blood pressure: नैसर्गिकरित्या बीपी नियंत्रणात ठेवायचाय? आहारात 'या' 7 पदार्थांचा करा समावेश

Pune Crime: दहावीत चांगले मार्क्स मिळवून देतो..., भोंदूबाबाकडून १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुणे हादरले

Maharashtra News Live Update: हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

Dark Eyebrows : तुम्हाला पण डार्क आयब्रो पाहिजे का? मग या घरगुती टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT