मंदिरा बेदीचा पती आणि फिल्ममेकर राज कौशल यांचे निधन  Saam tv
मनोरंजन बातम्या

मंदिरा बेदीचा पती आणि फिल्ममेकर राज कौशल यांचे निधन

मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) पती आणि फिल्ममेकर (FilmMaker) राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी सकाळी वयाच्या 49 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत. राज कौशलच्या निधनाबद्दल सोशल मीडियावरील सेलेब्रिज आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. (Mandira Bedi's husband and filmmaker Raj Kaushal passes away)

चित्रपट दिग्दर्शक ओनीर यांनी ट्वीट करून राज यांच्या मृत्यूची बातमी दिली. खूप लवकर निघुन गेलात. आज सकाळी आपण चित्रपट निर्माता आणि निर्माता राज कौशल यांना गमावले. ते माझ्या माय ब्रदर निखिल, चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या स्वप्नावर आणि विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक होते. देव त्याच्या आत्म्यास शांत करो.

राज कौशल कोण होते?

राज कौशल हे व्यवसायाने दिग्दर्शक आणि निर्माता होते. राजने एक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. नंतर त्याने चित्रपट निर्मीतीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. राज कौशलने अॅंथोनी कौन है, शादी का लड्डू, प्यार में कभी कभी ’या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर दुसरीकडे, माय ब्रदर ... निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी कभी भी या चित्रपटाची निर्मिती राज यांनी केली होती.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचे फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न झाले होते. 19 जून 2011 रोजी मंदिराने मुलगा वीरला जन्म दिला. गेल्या वर्षी 2020 मध्ये मंदिरा बेदी आणि राज यांनी 4 वर्षाची मुलगी दत्तक घेतली होती. तिचे नाव तारा बेदी कौशल आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द; भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर

Blood Clot: शरीरात 'ही' 7 लक्षणं दिसली तर समजा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यात

जमिनीचे तुकडे लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT