मृण्मयी देशपांडेचा 'मना’चे श्लोक' चित्रपट ऑक्टोबर महिन्यात रिलीज होत आहे.
'मना’चे श्लोक' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
'मना'चे श्लोक' चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे मुख्य भूमिकेत आहेत.
'मना’चे श्लोक' (Manache Shlok ) चित्रपटाच्या टीझरने सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यानंतर चित्रपटाच्या पहिल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. टीझर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला 'मना’चे श्लोक' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. थाटामाटात चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
'मना’चे श्लोक' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती पाहायला मिळतात. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहताना दिसतात. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार? ते दोघं एकत्र येतील का? लग्नासाठी तयार होतील का? हे सर्व चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात.
'मना’चे श्लोक' चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारमंडळी पाहायला मिळत आहेत. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
'मना’चे श्लोक' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले आहे. निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहे.प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.