Mrunmayee Deshpande  SAAM TV
मनोरंजन बातम्या

ManaChe Shlok: ...तर 'मनाचे श्लोक' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू संघटना आक्रमक, कारण काय?

ManaChe Shlok Marathi Movie: मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा मराठी चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, प्रदर्शनाआधीचं या चित्रपटाला पुण्यातून विरोध करण्यात येत आहेत.

Shruti Vilas Kadam

Mana Che Shlok Marathi Movie: मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा मराठी चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, त्यापूर्वी या चित्रपटाला पुण्यातून विरोध करण्यात येत आहेत. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी सांगितले की, “समर्थ रामदास स्वामी महाराजांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे पवित्र धार्मिक साहित्य आहे. या नावाचा वापर चित्रपटासाठी करणे हे केवळ श्रद्धेचा अपमानच नाही, तर धार्मिक भावनांना ठेस पोहोचवणारे आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “मनाचे श्लोक हे शीर्षक चित्रपटातून त्वरित मागे घ्यावे आणि केंद्र तसेच राज्य शासनाने भविष्यात अशा धार्मिक प्रतीकांच्या अविचारी वापरावर बंदी घालण्यासाठी कायदा करावा.”

दरम्यान, समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणात तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले, “चित्रपट दिग्दर्शकांना कसली आली लिबर्टी? लिबर्टीच्या नावाखाली काहीही करायचं का? ‘मनाचे श्लोक’ हा शब्द वापरायलाच कसा परवानगी दिली? जर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर आम्ही तो हाणून पाडू, आम्हाला तुरुंगात जायची भीती नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटात मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, शुभांगी गोखले, लीना भागवत आणि मंगेश कदम हे कलाकार झळकणार आहेत. सध्या हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धार्मिक वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्यामुळे या प्रकरणावर राज्यातील सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shamrao Ashtekar : माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, शरद पवारांचा निष्ठावंत सहकारी हरपला

Thursday Horoscope : अडचणीत सापडण्याची शक्यता, वेळेला हात द्यायला कोणी येणार नाही; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Maharashtra Live News Update : रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात, कांदिवली-बोरिवीलीदरम्यान घडली घटना

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT