Surabhi Jayashree Jagdish
तलासरी हे पालघर जिल्ह्याच्या अगदी उत्तरेकडील टोक आहे, जे दमण, दीव आणि दादरा-नगर हवेली (Silvassa) च्या सीमेवर आहे.
हा किल्ला सेंट जेरोम किल्ला म्हणूनही ओळखला जातो. दमणगंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर पोर्तुगीज शैलीतील भव्य वास्तुकला पाहण्यासाठी उत्तम आहे.
हा किनारा शांत आणि कमी गर्दीचा असल्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे. बोर्डी परिसर चिकू बागांसाठी प्रसिद्ध आहे.
डहाणू जवळ एका डोंगरमाथ्यावर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई असून, इथून तुम्हाला संपूर्ण परिसर आणि समुद्राचं दूरवरचं दृश्य दिसते
दादरा आणि नगर हवेलीमध्ये असलेला दुधनी तलाव दमणगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे तयार झाला आहे. या ठिकाणी रोमँटिक बोटिंग आणि अन्य वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
तलासरीच्या अगदी जवळच असलेलं हे एक डोंगराळ आणि आदिवासीबहुल गाव आहे. हा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला असून, विशेषतः हिवाळ्यात इथलं सौंदर्य खुलतं.
दमनगंगा नदीवर असलेला हा विशाल जलाशय भंडारा-वापी मार्गावर आहे. धरणाच्या जलाशयामुळे तयार झालेलं नैसर्गिक सौंदर्य आणि इथली शांतता मनाला विरंगुळा देतं.