Vinamra Bhabal Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vinamra Bhabal Wedding: 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात; लग्नाचे क्यूट फोटो व्हायरल

Vinamra Bhabal Wedding Photos: ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता विनम्र भाबलने नुकताच लग्न केले. त्याच्या लग्नाचे क्यूट फोटो व्हायरल होत आहेत. सध्या विनम्रवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Priya More

Man Udu Udu Zhala Serial:

मराठी मनोरंजनसृष्टीत एकापोठपाठ एक सेलिब्रिटी प्रेमाची कबुली देत विवाहबंधनात अडकत आहेत. नुकताच अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला होता. तर अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) अभिनेता प्रसाद जवादेसोबत (Prasad Jawade) लग्न केले. अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) गुपचूप लग्न केले आहे.

त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेता विवाहबंधात अडकला आहे. ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता विनम्र भाबलने नुकताच लग्न केले. त्याच्या लग्नाचे क्यूट फोटो व्हायरल होत आहेत. सध्या विनम्रवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने अल्पावधित प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या मालिकेत सत्तूची भूमिका साकारणाऱ्या विनम्र भाबलला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. सर्वांचा लाडका हाच अभिनेता आता विवाहबंधनात अडकला. विनम्रने ८ डिसेंबरला थाटामाटामध्ये लग्न केले. त्याच्या लग्नाला ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गळेसह इतर कलाकारांनी देखील हजेरी लावली.

Vinamra Bhabal Wedding

विनम्रच्या पत्नीचे नाव पूजा आहे. दोघांचा लग्नसोहाळा अतिशय उत्साहात पार पडला. त्यांच्या लग्नाला हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब यांनी उपस्थिती लावत विनम्रला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कलाकारांनी सोशल मीडियावर विनम्रच्या लग्नातील फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. सध्या विनम्रवर त्यांच्या चाहत्यांसह सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Vinamra Bhabal Wedding

विनम्र भाबलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विनम्रने मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील पात्राला चांगली पसंती मिळाली होती. या मालिकेमुळे तो घराघरामध्ये पोहचला. सध्या त्याचं रंगभूमीवर ‘राजू बन गया Zentalman’ हे नाटक सुरू आहे. या नाटकात विनम्रसोबत अभिनेता अंशुमन विचारे, उमेश जगताप आणि अमृता फडके हे कलाकार काम करत आहेत. त्यांच्या या नाटकाला देखील प्रेक्षकांकडून प्रसिद्धी मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT