Famous Actress  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने फेटाळली VVIP ची तिसरी बायको होण्याची ऑफर, अब्जाधीश दरमहा देणार होता 11 लाख

Famous Actress Rejected VVIP Offer : प्रसिद्ध अभिनेत्रीने व्हीव्हीआयपी व्यक्तीकडून मोठी ऑफर नाकारली. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीने एका विवाहित पुरुषाची तिसरी पत्नी होण्याची ऑफर नाकारली.

अभिनेत्रीला लग्नाची ऑफर एका 'व्हीव्हीआयपी' व्यक्तीकडून आली होती.

ती व्यक्ती अभिनेत्रीला दरमहा 11 लाख देणार होती.

मलेशियन अभिनेत्री आणि ब्यूटी क्वीनने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितल्यानुसार अभिनेत्रीला विवाहित पुरुषाची तिसरी पत्नी बनण्याची ऑफर आली होती. पण ती तिने नाकारली. तसेच तिला मालमत्ता, जमीन आणि लग्जरी लाइफस्टाइल देणार असल्याचे सांगितले. नेमकं प्रकरणा काय, जाणून घेऊयात.

मलेशियन सौंदर्यवतीचे नाव एमी नूर टिनी असे आहे. ती 29 वर्षांची आहे. मलेशियन कंटेंट क्रिएटर सफवान नझरीच्या पॉडकास्टमध्ये एमीने हा मोठा खुलासा केला. तिने सांगितले की, "हा प्रस्ताव एका व्हीव्हीआयपी व्यक्तीकडून आला होता. तिसरी पत्नी बनण्याच्या बदल्यात त्या व्यक्तीने मला एक बंगला, एक कार, 10 एकर (40,000 चौरस मीटर) जमीन आणि दरमहा 50,000 आरएम (सुमारे 11 लाख रुपये) भत्ता देऊ केला." व्हीव्हीआयपी म्हणजे मलेशियामधील अत्यंत उच्च सामाजिक आणि आर्थिक दर्जा असलेल्या व्यक्ती होय.

एमीने पुढे सांगितल्यानुसार, कॉर्पोरेट कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना तिचा अनेकदा मोठ्या व्यक्तींशी संपर्क येतो, त्यापैकी बरेच जण तिचा फोन नंबर मागतात किंवा तिला बाहेर भेटायला बोलावतात. अशाच एका भेटीदरम्यान एका व्यक्तीने तिला आपली तिसरी पत्नी बनण्याचा ऑफर दिली. पण ऑफर तिने तात्काळ नाकारली.

एप्रिलमध्ये मलेशियन माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत, एमीने याच घटनेचा संदर्भ दिला होता. ज्यात तिने सांगितले होते की, तो माणूस एक 'दातुक' (Datuk) होता. 'दातुक' हे मलेशियामध्ये वापरले जाणारे एक सन्माननीय पद आहे. ही ऑफर 2019 च्या सुमारास आली होती. जेव्हा एमी 23 वर्षांची होती. त्यावेळी अभिनेत्री सौंदर्य स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेत होती. त्यावेळी एमी परदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कॉर्पोरेट स्‍पॉन्‌सर शोधत होती. तिने सांगितले की, त्या दातुकने तिला मदत करण्याची ऑफर दिली होती. परंतु फक्त या अटीवर की तिने त्याची तिसरी पत्नी म्हणून त्याच्याशी लग्न करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात खासदार धानोरकर यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन होणार

GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT