Singer Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singer Death : जादुई आवाज हरपला! प्रसिद्ध गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

Famous Singer Passes Away : संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय गायकाचे निधन झाले आहे. गायकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संगीत विश्वावर शोककळा

प्रसिद्ध गायकाचे निधन

गायकाने वयाच्या ४४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळी गायक निसार वायनाड (Nisar Wayanad ) यांचे शनिवारी संध्याकाळी दुबईतील एका रुग्णालयात निधन झाले. गायकाच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्याच्या कुटुंबावक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाच्या कारकि‍र्दीबद्दल जाणून घेऊयात.

gulfnews च्या वृत्तानुसार, गायक निसार वायनाड यांना मृत्यूच्या काही तास आधीच त्यांना अजमानमधील एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करायचा होता. निसार अरोथ इब्राहिम हे त्यांचे मूळ नाव होते. ४४ वर्षीय निसार हे त्यांच्या आवाजामुळे ओळखले जात होते.

गायक निसार वायनाड हे दुबईमध्ये विविध संगीत कार्यक्रम करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.'गल्फ न्यूज'च्या वेबसाइटवरील वृत्तानुसार, दुबईतील त्यांच्या मित्रांनी सांगितले की, शनिवारी दुपारी त्यांना तीव्र ताप आला होता. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दुबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण 'ॲसिडोसिस' (acidosis) असे सांगण्यात आले आहे. ज्या दिवशी त्यांना अजमानमध्ये सादरीकरण करायचे होते, त्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

निसार वायनाड यांच्या निधनाची बातमी समजताच कलाकारमंडळी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या शैलींमध्ये गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT