Drama Based On Cm Eknath Shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Sena Split: 'मला काहीतरी सांगायचंय', शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर; CM शिंदेंवर आधारित नाटकावरून राजकारण तापणार?

CM Eknath Shinde : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधिरीत 'मला काहीतरी सांगायचंय' हे नाटक रंगमंचावर येणार आहे यामध्ये शिवसेना फुटीची कथा मंचावर पाहायला मिळणार आहे.

Satish Kengar

राज्यात विधानसभा निवणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. यातच अलीकडे निवडणूक म्हटली की, एखाद्या राजकीय विषयावरील चित्रपट रिलीज होणं, हा एक ट्रेंडच झाला आहे. अशातच आता अशी बातमी समोर आली आहे की, लवकरच शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक असून याचे नाव 'मला काहीतरी सांगायचंय', असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'मला काहीतरी सांगायचंय' हे एकपात्री नाटक असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित या नाटकात संग्राम समेळ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सेन्सॉर बोर्डाकडे हे नाटक आहे. दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित या नाटकात एकनाथ शिंदे यांचं पात्र शिवसेना फुटीबद्दल नेमकं काय सांगणार? यातून काही नवीन सत्य समोर येणार आहे का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना फुटीची दोन वर्ष

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत मोठे खिंडार पाडले. दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेची निवडणुकीत मतदान केल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेच्या 42 आमदारांनी गटागटाने सुरत, गुवाहटी, गोव्याकडे कूच केली होती. यानंतर भाजपसोबत युती करत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आधी सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे टप्याटप्याने गेले. याचदरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे यांचीच सेना खरी शिवसेना असल्याचं म्हणत त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. दरम्यान, अद्यापही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT