Mahira Khan Is Suffering From Bipolar Disorder Instagram
मनोरंजन बातम्या

Mahira Khan: पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज, ‘या’ बॉलिवूड चित्रपटानंतर आयुष्यच बदललं...

Mahira Khan News: माहिराने एका मुलाखतीत तिला गंभीर आजाराचे निदान झाल्याचे स्पष्ट केले आहे.

Chetan Bodke

Mahira Khan Is Suffering From Bipolar Disorder

रईस फेम अभिनेत्री माहिरा खान कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. माहिरा खान ही प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री असून तिची ओळख भारतातही आहे. तिने आतापर्यंत काही भारतीय चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या माहिरा खान नुकतीच एक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

शाहरुख खानच्या रईस चित्रपटातून माहिराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रईस चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. रईस चित्रपटामुळेच माहिराला भारतात प्रसिद्धी देखील मिळाली होती. नुकताच माहिराने एका मुलाखतीत तिला गंभीर आजाराचे निदान झाल्याचे स्पष्ट केले आहे.

माहिराने नुकतंच एफ व्हाय पॉडकास्टला मुलाखत दिली. रईस चित्रपटादरम्यानच उरी हल्ला झाला होता. त्यामुळे तिला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात न येण्याच्या धमक्या मिळत होत्या.

दरम्यान, माहिराने मुलाखतीत सांगितले की, “मी रईस चित्रपट पूर्ण केला. सर्व काही व्यवस्थित होते. अचानक हा उरी हल्ला झाला. सर्व परिस्थिती बदलली. त्या काळात मला सतत सोशल मीडियावर, कॉलवर धमक्या येत होत्या. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते.”

मुलाखतीत माहिरा म्हणाली, “रईस चित्रपटादरम्यान माझी तब्येत खराब झाल्यासारखी वाटत होती. लगेचच मी डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी मला बायपोलर डिसॉर्डर झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून मी त्या आजारावर लगेचच औषधोपचार सुरू केले.”

“ज्यावेळी मी ओषधोपचार बंद करण्याचा विचार केला, तर मी अजूनच डिप्रेशनमध्ये गेली. मी खूप चिंतेत होती. माझ्यासाठी तो काळ खूप कठिण होता. माहिरा गेल्या ६-७ वर्षांपासून डिप्रेशनवर उपचार घेत आहे. असा खुलासा तिने केला.”

माहिराचा रणवीर कपूरसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्यावर खूप टीका झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

SCROLL FOR NEXT