Mahesh Manjrekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

Punha Shivaji Raje Bhosale Controversy : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

महेश मांजरेकर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेते आहेत.

लवकरच महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट रिलीज होणार आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मुळे (Punha Shivaji Raje Bhosale ) चांगलेच चर्चेत आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या चित्रपट निर्मिती कंपनीने केली आहे. चित्रपटाच्या संबंधित स्वामित्त्व हक्काचे (कॉपी राइट्स) उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कंपनीने केलेल्या दाव्यात कराराचे उल्लंघन, कॉपीराइट्सचे उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,"'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सीक्वल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा सिनेमा पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे."

2009 साली 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. यात कंपनीकडे 60 टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे 40 टक्के हक्क होते. मात्र 2013 मध्ये महेश मांजरेकर यांनी 40% हक्क एव्हरेस्ट एंटरटेन्मेटला दिले. त्यामुळे कंपनी चित्रपटाशी संबंधित सर्व हक्कांची एकमेव मालक बनली. यात सीक्वलचे विशेष अधिकार किंवा हक्कांचा समावेश आहे. असा दावा कंपनीने याचिकेत केला आहे.

न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन चित्रपटाचे विशेष प्रदर्शन सोमवारी (ता. २०) आयोजित करण्याचे आदेश दिले. विशेष प्रदर्शनानंतरही चित्रपटाबाबत काही आक्षेप असल्यास कंपनीने त्याबद्दल न्यायालयाला सांगावे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT