Sachin Goswami Post  Instagram
मनोरंजन बातम्या

Sachin Goswami Post: ‘समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे...’ हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींची पोस्ट व्हायरल

Sachin Goswami News: सोशल मीडियावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Sachin Goswami Post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’हा कॉमेडी शोने सध्या काही काळासाठी बंद असला तरी, कायमच या शोची सोशल मीडियावर चर्चा होत असते. शोमधील कलकारांप्रमाणेच शोचे दिग्दर्शक देखील कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट केली होती. त्या पोस्टची ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. अशातच त्यांनी आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, “समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे. आता ज्याचे खरच देशा वर प्रेम आहे अशा नागरिकांनी समाजातील या विषबाधा झालेल्या आपल्या परिचयातील युवकांना योग्य समुपदेशन करुन, सत्य सांगून, वास्तवाची जाणिव करून दिली पाहिजे. आपल्या परिसरापुरता जरी प्रयत्न केला तरी समाजातील एकोपा वाढीस मदत होईल. आता तटस्थता उपयोगाची नाही. आपापल्या माध्यमांनी समाज निर्विष करू या. संवेदनशील होऊ या .... माणूस होऊ या...”

दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. ‘अंधभक्तांपुढे डोके फोडले तरी काय उपयोग नाही, सत्य Accept करायला कोणीच तयार नाही. आपले सजेशन चांगले आहेत. परंतु ते फक्त आपल्या विचारांची माणसं समजू शकतील.’ ‘अनेक जणं संभ्रमित आहेत, अशा कुपणावरच्याना किमान सुबुद्ध केलें तरी खूप. आपण सत्य वास्तव मांडत राहणे गरजेचे आहे.’ अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिली आहे.

सोबतच पुढे काही नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली, ‘आता तटस्थता उपयोगाची नाही. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. खूप मोठ्या लोकांनी तटस्थता दाखवली, गप्प राहिले म्हणून हे सर्व डोक्यावर बसले.’

तर आणखी एक युजर म्हणतो, ‘सर समजावून सांगुन काही उपयोग नाही. ह्यांचे तोंड जेव्हा भाजले जाईल तेव्हाच ह्यांची अक्कल ठिकाणावर येईल.’ तर पुढे आणखी एक युजर म्हणतो, ‘बोलणारे तुमच्याआमच्यासारखे अल्पसंख्य झालेत. तथाकथित बुध्दिवंत- प्रतिभावंत मौन बाळगून कातडीबचावत आहेत. हेच बेबंदशाहीच्या पथ्यावर पडत आहे सर !’

महागाई, पाणी, खड्डे , धर्म या सगळयात इतके अडकवून ठेवले आहे की सामान्य माणूस डोकं वर काढून इतर काही बघूच शकत नाही किंवा बघू नये या साठी हे सगळे.... काही बुद्धिजीवी हा प्रयत्न करतात पण ते नगण्य आहेत...’ अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांना प्रतिक्रिया दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT