Vanita Kharat New Serial Instagram
मनोरंजन बातम्या

Vanita Kharat New Serial: हास्यजत्रा फेम वनिता खरातची ‘सुंदरी’मध्ये बेधडक एन्ट्री, मालिकेत साकारणार ‘हे’ पात्र

Vanita Kharat News: नेहमीच पोटधरुन हसवणारी वनिता आता एका मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Chetan Bodke

Vanita Kharat Play Role In Sundari Serial

वनिता खरात हे नाव जरी आपण उच्चारलं तरी, आपल्या नजरेसमोर लगेचच हास्यजत्रेतले स्किट नजरेसमोर येतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून कायमच आपण वनिताला पाहत आलोय. नेहमीच पोटधरुन हसवणारी वनिता आता खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या नव्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

नेहमीच पोटधरुन हसवायला लावणारी वनिता आता प्रेक्षकांच्या मनात दरारा निर्माण करेल की काय, सध्या अशी चर्चा सर्वत्र होतेय. कारण वनिता खरातला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत ती दिसणार आहे. अर्थात, ती या भूमिकेमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेईलच, यामध्ये शंका नाही. ‘सन मराठी’वरील ‘सुंदरी’ मालिकेचे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या नवीन पर्वामध्ये सुंदरीच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि तिचा हा नवीन प्रवास आव्हानात्मक असणार आहे. अनेक अडचणींना सुंदरीला अगदी धीराने सामोरं जावं लागणार आहे, त्यातील एक अडचण म्हणजे ‘साहेब’. (Serial)

‘साहेब’ या नावाप्रमाणेच त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व देखील भारदस्त, बेधडक, जिगरबाज अशा स्वरुपात पाहायला मिळणार आहे. पण ही व्यक्ती पुरुष नसून स्त्री आहे आणि ‘साहेब’ या खलनायिकेची भूमिका वनिता खरात साकारत आहे. नुकताच वनिताच्या भूमिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वनिताला या अनोख्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार हे नक्की. (Marathi Actress)

‘तू जरी असली कलेक्टर तरी कायदा हा साहेबाचा चालतो...’ या दमदार डायलॉगमुळे वनिताच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. आता साहेब आणि सुंदरी समोरासमोर आल्यावर नेमकं काय होणार, हे आपल्याला मालिका पाहिल्यावरच कळेल. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT