Priyadarshini Indalkar America Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyadarshini Indalkar Video: “२३ दिवस, २ देश, ११ प्रयोग...”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनीने परदेशातून शेअर केला खास व्हिडीओ

Priyadarshini Indalkar Viral Video: अमेरिकेत निवडक प्रयोग करण्यासाठी गेलेले सर्व कलाकार २३ दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तिथे प्रेक्षकांचे मिळालेले प्रेम पाहून सर्वच कलाकार भारावले.

Chetan Bodke

Priyadarshini Indalkar America Video: देशासह परदेशातदेखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या शोचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांचाही चाहतावर्ग फार मोठा आहे. अनेकदा त्यातील कलाकार शोमधल्या काही स्किटमुळे सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत राहतात.

मे महिन्यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. ब्रेक घेऊन हे सर्व कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेरिकेत काही निवडक प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते.

अमेरिकेत निवडक प्रयोग करण्यासाठी मालिकेतील सर्वच कलाकार गेले २३ दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तिथे प्रेक्षकांचे मिळालेले प्रेम पाहून सर्वच कलाकार भारावले.

एका कॉमेडी शोला पहिल्यांदाच परदेशात एवढा मोठा प्रतिसाद मिळणे, ही फार महत्वाची बाब आहे. अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीममधील सर्वच कलाकार मिळणारा प्रतिसाद पाहून भारावले. परदेशातल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद पाहून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला. सध्या तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अमेरिका आणि कॅनडा दौरा २०२३ असं त्या व्हिडीओला कॅप्शन देत आपल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनी पुढे म्हणते, “२३ दिवस, ११ प्रयोग, ९ राज्य, ११ शहरे, २ देश आणि तिथल्या अनेक प्रेक्षकांनी दिलेले निस्सिम प्रेम... मी खरंच खूप भाग्यवान आहे. आमच्या या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा परिवार इतका मोठा असेल याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता. दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अमिक फाळके, ५ डि डायमेन्शन, सोनी मराठी, प्रमोद पाटील, यतिन पाटील तुमच्या सर्वांशिवाय इतका मोठा पल्ला गाठणं शक्य नव्हतं.”

तर प्रियदर्शनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी व्हिलचेअरवर बसलेली दिसली. त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “एका कार्यक्रमादरम्यान माझी तब्येत बरी नव्हती, मला जेवणातून विषबाधा(Food Poisoning) झाली होती. त्यामुळे अमित फाळकेंनी मला विमानतळ ते पुढच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत त्यांनी व्हिलचेअरवर ओढत नेले.”

दरम्यान प्रियदर्शनीने शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी कोणकोणत्या शहरात त्यांचा कार्यक्रम झाला, याविषयी सांगितले. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने टॅंपा, ॲटलॉंटा, बॉस्टन, न्यू जर्सी, टोरंटो, वॉश्टिंगटन डिसी, दल्लास, व्हँकुव्हर, सिएटल, सॅन जोस आणि सॅन दिएगो या ११ शहरांमध्ये ११ प्रयोग घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या व्हिडीओत कार्यक्रमाला परदेशातल्या प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला, याबद्दल दाखवून तिने दाखवले होते.

या विनोदी मालिकेने सध्या प्रेक्षकांकडून निरोप घेतला असून प्रेक्षक त्यामुळे सध्या उदास आहेत. मालिकेचे जुने एपिसोड पाहून प्रेक्षक स्वतःचे मनोरंजन करत आहेत. अशातच २९ जुलैला गौरव मोरेने त्याच्या चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर करत मालिकेचा नवा सिझन येत असल्याची माहिती दिली. मालिकेचा येत्या १४ ऑगस्टपासून नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दौरा संपवून सर्वच कलाकार परतले असून नव्या जोमाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे सर्व सेलिब्रिटी शोमध्ये दिसणार आहेत. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या मोठ्या गॅपनंतर ही सर्व टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT