Atul Kulkarni Share Post : 'बापू, मारलं की मारायचं असतं...' अतुल कुलकर्णीने संभाजी भिडेंना थेट कवितेतून दिलं उत्तर

Atul Kulkarni On Sambhaji Bhide : अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी देखील कविता पोस्ट करत गांधीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Atul Kulkarni Poem On Mahatma Gandhi
Atul Kulkarni Poem On Mahatma Gandhi Instagram @atulkulkarni_official

Atul Kulkarni Poem : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे करमदास गांधी यांचे पुत्र नाहीत, तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत असे भिडे गुरुजींनी म्हटले आहे.

भिडे गुरुजी यांच्या या वक्तव्यांवर राजकारण तापलं आहे. राजकीय नेत्यांसह, सामाजिक क्षेत्रातून देखील त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

Atul Kulkarni Poem On Mahatma Gandhi
Deepika Padukone Promoting Ranveer Singh's Movie : रणवीर सिंगची बायको गुणाची; नवऱ्याच्या चित्रपटाचं दीपिका करतेय भन्नाट प्रमोशन

तर कला क्षेत्रातील आणि कलाकारांनी देखील संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. कवी, अभिनेते सौमित्र यांनी फेसबुकवर पोस्ट करत संभाजी भिडेंवर टिकलेली आहे. तर अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी देखील कविता पोस्ट करत महात्मा गांधीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे अतुल कुलकर्णीची पोस्ट ?

अतुल कुलकर्णी यांनी संभाजी भिडेंनी केलेल्या गांधींवरील वक्तव्यावर कवितेच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली आहे. या कवितेतून अतुल यांनी म्हटले आहे की, 'हत्या झाली तरी महात्मा गांधी आपल्यातून गेले नाही. त्यांची हत्या झाल्यावर त्यांनी मारायला हवं होत. पण ते आपल्यात अजूनही जिवंत आहेत.'

Atul Kulkarni Poem On Mahatma Gandhi
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 2nd Day Collection: रणवीर- आलियाचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ बॉक्स ऑफिसवर सुसाट, विकेंडला केली इतक्या कोटींची कमाई

अतुल कुलकर्णी यांची कविता

तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं !!

गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.

तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू....

असं नसतं करायचं, मारलं की मरायचं !

एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस

बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.

मारलं की निमुट मरायचं असतं !!

तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ

ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो

जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं

मारलं की निमूट मरायचं असतं...पुढच्या वर्षी नक्की मरं !!!

- अतुल कुलकर्णी (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com