Maharashtrachi Hasyajatra Team Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra : ऑस्ट्रेलियात डोलतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; हास्यवीरांचा भन्नाट डान्स, VIDEO बघून खळखळून हसाल

Maharashtrachi Hasyajatra Team Dance: अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Namrata Sambherao:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची (maharashtrachi hasya jatra) टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरामध्ये धम्माल करतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशामध्ये आता अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त मजामस्ती करत आहे. नुकताच हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने ऑस्ट्रेलियातील रस्त्यावर भन्नाट डान्स केला. 'गवताचं पातं...' या गाण्यावर या सर्वांनी जबरदस्त डान्स केला. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, पृथ्विक प्रताप, वनिता खरात, प्राजक्ता माळी, ओमकार राऊत, आणि चेतना भट हे सर्व कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर डान्स करत या सर्वांनी हा भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे. जो पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत.

नम्रता संभेरावच्या स्पेशल एपिसोडमधील 'गवताचं पातं...' हे गाणं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या संपूर्ण टीमने एकत्र येत डान्स केला. या व्हिडीओमध्ये नम्रताच्या स्टाइलमध्ये सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर डान्स करता करता एक-एक जण बाहेर निघून जातो. शेवटपर्यंत नम्रता एकटीच डान्स करताना दिसत आहे. समीर चौगुले मात्र उभं राहून या सर्वांची मजा बघत असतो. शेवटची तो 'गवताची पातं पेटवून दे' असं म्हणून नम्रता संभेरावच्या डोक्यावर टपली मारतो. त्यानंतर हे सर्वजण हसताना दिसतात.

नम्रताच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. 'माझे सर्वात आवडते गवताचं पातं...हममममम...बया....', 'हे शेवटपर्यंत डुलणारे गवताचं पातं आवडलं बा...', 'माझा सर्वात आवडता एपिसोड', 'मस्ती फूल ऑन', अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी, लाफिंग इमोजी पोस्ट केले आहेत. दरम्यान, नम्रता संभेराव ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांसाठी सतत पोस्ट करत आहे. वेगवेगळ्या लूक आणि स्टाइलमधील ती फोटो पोस्ट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT