JNU Poster Released: शैक्षणिक संस्था देश तोडू शकते का?, 'जेएनयू'चित्रपटाचे पोस्टर आऊट

JNU Jahangir National University Movie: विनय वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला चित्रपट 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी'चा पहिले पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टरवरुन दिसून येत आहे की वादाचे या विद्यापीठाशी खास कनेक्शन आहे.
JNU Jahangir National University Movie
JNU Jahangir National University MovieSaam Tv
Published On

JNU Poster Out:

दिल्लीतील (Delhi) जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजेच जेएनयू (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी या विद्यापीठामध्ये कोणताही सेलिब्रिटी गेला नाही किंवा त्याठिकाणी कोणताही वाद झाला नाही. जेएनयू चर्चेत आले आहे यामागचे कारण म्हणजे आता जेएनयूवर चित्रपट (JNU Movie) तयार होत आहे. विनय वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला चित्रपट 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी'चा पहिले पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टरवरुन दिसून येत आहे की वादाचे या विद्यापीठाशी खास कनेक्शन आहे.

'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच ते चर्चेत आले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेएनयू चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट. ५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिक्षणाच्या बंद भिंतींमागे देशाला तोडण्याचा कट रचला जात आहे.'

'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी' या चित्रपटात मानवीय असंतोषाची तीव्र शक्ती आणि मानवी विचारांमधील विरोधाभास दिसून येत आहे . या चित्रपटाचे पहिले खळबळजनक टीझर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये एका हातामध्ये भगव्या रंगाचा भारताचा नकाशा पकडण्यात आल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर टॅगलाइनमध्ये 'एखादी शैक्षणिक संस्था,विद्यापीठ देश तोडू शकते का?', असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

JNU Jahangir National University Movie
Kiran Mane: शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र..., किरण माने यांचं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य

हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमॅटिक जगाची पहिली झलक देतो. पोस्टर स्वतःच एक दृश्य आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे. ज्यामध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमधील वातावरण आणि गोंधळाचे चित्रण करत आहे. तीव्र मतभेदाच्या पार्श्वभूमीवर, भगव्या रंगात लपलेले भारताचे छायचित्र भितीदायक दिसते. हा नकाशा देशाची विखुरलेली ओळख प्रतीकात्मकपणे सादर करतो. आपल्या अस्मिता आणि मूल्यांशी झगडत असलेल्या राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर जेएनयू शिक्षण, राजकारण आणि विचारधारा यांच्यातील अंतरसंबंध दर्शवत आहे. त्याचप्रकारे चित्रपटाचा आकर्षक कथानक , कटू सत्यांचा सामना करण्यास प्रेक्षकांना आव्हान करत आहे.

महाकाल मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) निर्मात्या प्रतिमा दत्ता यांनी केली असून दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे.चित्रपटात उर्वशी रौतेला, पीयूष मिश्रा, रवि किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे, सोनाली सेगल यासारखे प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत . हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.

JNU Jahangir National University Movie
म्हणून तुझ्या हृदयात अजून धडधड चालू आहे..., Amey Waghने Shreyas Talpade साठी वाचलेल्या कवितेने सगळेच रडू लागले; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com