मराठी मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार 'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा'ची (Zee Chitra Gaurav Awards 2024) आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा 'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 2024' नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी पारंपरिक लूकमध्ये हजेरी लावत चार चाँद लावले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) श्रेयस तळपदेसाठी (Shreyas Talpade) खास कविता वाचून दाखवली. त्याच्या या कवितने या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वांनाच रडू आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 2024 मध्ये अभिनेता अमेय वाघने अभिनेता श्रेयस तळपदेसाठी कविता वाचून दाखवली. त्याने वाचलेल्या कवितेने श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दिप्तीसोबत सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. अनेक सेलिब्रिटी रडू लागले. अमेयने कविता वाचल्यानंतर श्रेयस खूपच भावुक झाला त्यानंतर त्याने हात जोडत अमेयचे आभार मानले. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमेय वाघ हा श्रेयस तळपदेसाठी कविता वाचून दाखवतो. म्हणतो की, 'संपले जरी श्वास श्रेयस ते परत घेऊन येईल, श्वास जरी संपले असले तरी हात होता हाती, कारण देवासमोर भांडत तिथे त्याची बायको उभी होती, देव म्हणाला जा परत हिरो म्हणाला काय, आईच्या मनात मायेची रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात उणीची आणी बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे, म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे, म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.'
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'वाजले की बारा' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. तर सारा अली खानने यावेळी उपस्थित कलाकार आणि प्रेक्षकांसोबत मराठीमध्ये संवाद साधला. या दोघींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघींही यावेळी मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या. त्यांचा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.