Maharashtrachi Hasya Jatra Saam Digital
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूला मिळालं म्हाडाचं घर, 'दत्तू चाळीविषयी काय म्हणाला दत्तू? जाणून घ्या

MHADA Lottery : महाराष्ट्राची हस्यजत्रा या मराठमोळ्या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला 'दत्तू' म्हणजेच अभिनेता दत्तू मोरे लवकरच आपल्या हक्काच्या घरात जाणार आहे. दत्तूला म्हाडाच्या लाॅटरीत एक नव्हे तर चक्क दोन घरे लागली आहेत.

Sandeep Gawade

Maharashtrachi Hasya Jatra

महाराष्ट्राची हस्यजत्रा या मराठमोळ्या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला 'दत्तू' म्हणजेच अभिनेता दत्तू मोरे लवकरच आपल्या हक्काच्या घरात जाणार आहे. सध्या ठाण्यातील छोट्याशी चाळीत राहणा-या दत्तूला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लाॅटरीत एक नव्हे तर चक्क दोन घरे लागली आहेत. त्यामुळे दत्तू ख-या अर्थाने घरंदाज झाला असून लवकरच चाळीतून अलिशान फ्लॅटमध्ये त्याचे मार्गक्रमण होणार आहे.

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकतीच पाच हजारहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढली होती. त्यासाठी जवळपास २५ हजार अर्ज आले होते. मूळचा ठाण्याचा असलेला अभिनेता दत्तू मोरे वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या चाळीत वास्तव्याला आहे. त्याचे बालपणही याच चाळीत गेले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने घरांसाठी काढलेल्या लाॅटरीत आपले नशीब आजमावण्यासाठी ठाण्यातील दोन ठिकाणी अर्ज भरले होते. पहिल्यादाच म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरलेल्या दत्तूला नशीबानेही चांगला साठ दिली असून त्याला ठाण्याच्या रौनक ब्लिझ आणि हायलॅंड स्प्रिग या दोन गृह प्रकल्पात घरे लागली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून दत्तू घराघरात पोहोचलेल्या दत्तूचा गौरव म्हणून तो ज्या चाळीत वास्तव्याला आहे त्या चाळीला चाळक-यांनी या चाळीला प्रेमाने 'दत्तू चाळ' असे नाव दिले.

चाळीबाबत अत्मियता

आपला आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, पहिल्याच प्रयत्नात मला म्हाडाचे घर मिळाले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना इतरांप्रमाणे मी देखील उंच टोलेजंग इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्यावर काहीशा मर्यादा येत होत्या. पण आता माझे हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. माझे बालपण चाळीत गेल्यामुळे फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन, हे मला माहित नाही. तरीही मी नव्या घरात राहायला गेलो तरी चाळीबाबत माझ्या मनात कायमच अत्मियता राहिल अशी भावना दत्तू मोरे याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT