Gaurav More Instagram
मनोरंजन बातम्या

Gaurav More: स्वप्नपूर्ती! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता गौरव मोरेने नुकतीच स्वतःची पहिली कार खरेदी केली आहे.

Shruti Vilas Kadam

Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता गौरव मोरेने नुकतीच स्वतःची पहिली कार खरेदी केली आहे. गौरवने आलिशान Skoda Kylaq गाडीची खरेदी केली आहे. या आनंददायी क्षणाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.​

गौरव मोरेने 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी विनोदी कार्यक्रमात आपल्या पहिल्या कार खरेदीचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "मी एका शोमध्ये काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं." त्याने दीड लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा विचार केला, परंतु त्याच्या बजेटमध्ये ती बसत नव्हती. तरीही, त्याने आपल्या आईसोबत ऐरोलीला जाऊन कार पाहिली आणि ती खरेदी केली. या प्रसंगी त्याने आपल्या वडिलांची आठवण काढत भावुक होऊन सांगितले की, "बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली पण, तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबा नव्हते. २०१५ मध्ये बाबा गेले…गाडी थोडी उशिरा घेतली." ​

गौरव मोरेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मुंबईतील पवई येथील फिल्टर पाडा या झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेल्या गौरवने आपल्या मेहनतीने मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आजही ते आपल्या मूळ ठिकाणी राहतो, कारण त्याला त्या ठिकाणाशी असलेली नाळ जपायची आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, "फिल्टर पाडा भागातल्या घराने, त्या मातीने मला खूप काही दिलंय. माझ्या बाबांची सुरुवात आणि शेवट याच घरात झाला आहे." ​

गौरव मोरे त्याच्या संघर्षमय प्रवासाची आणि वडिलांच्या आठवणींची साक्ष म्हणून ही कर खरेदी केली आहे. त्याच्या या भावनिक प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT