Pruthvik Pratap Bought New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pruthvik Pratap Bought New Car : "स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासाला..." ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने खरेदी केली ड्रीम कार

Pruthvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने अनेक कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. अभिनेता पृथ्वीक प्रताप याने गेल्या काही दिवसांपूर्वीच घर खरेदी केले होते. घर खरेदी केल्यानंतर आता अभिनेत्याने नवीन कार खरेदी केली आहे.

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने अनेक कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. या कॉमेडी शोमधील जवळपास सर्वच कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी शोमधील अनेक कलाकारांनी घर घेत किंवा अलिशान कार खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. प्राजक्ता माळी, शिवाली परब, रोहित माने यांनी नवीन घर खरेदी केली तर सई ताम्हणकरने नवी अलिशान कार खरेदी करत सर्वांचेच लक्ष वेधले.

अशातच शोमधील आणखी एका कलाकाराने नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. हा दुसरा तिसरा कोणीही नसून पृथ्वीक प्रताप आहे. पृथ्वीकने ड्रीम कार खरेदी करत सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले. पृथ्वीकने कियाची नवी कार खरेदी केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. त्यासोबतच त्याच्या आईच्या आणि भावाच्या चेहऱ्यावर नवी कार खरेदी केल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

अभिनेत्याने कारच्या शोरूममधील अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, "पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या. कोणतीही पहिली गोष्ट आपल्यासाठी खास असते म्हणून. (सीरी प्लीज ‘आले तूफान किती…’ गाणं लाव)" अभिनेत्याची ही इन्स्टा पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या पोस्टवर प्राजक्ता माळी, शिवाली परब, पुजा सावंत, ऋतुजा बागवे, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, स्पृहा वरद, वनिता खरात, दत्तु मोरे, प्रथमेश परबसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याचे कौतुक केले आहे. शिवाय, त्यांनी पृथ्वीकडे पार्टीही मागितले आहे. पृथ्वीकने जानेवारी २०२४ मध्येच नवीन घर खरेदी केले आहे. आता अवघ्या ६ महिन्यांतच अभिनेत्याने नवीन कार खरेदी केली आहे.

पृथ्वीक प्रतापबद्दल सांगायचे तर, पृथ्वीकला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने विशेष प्रसिद्धी दिली आहे. पृथ्वीकने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपट, मालिका आणि एकांकिकेमध्ये काम केले आहे. 'जागो मोहन प्यारे', 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. शिवाय, 'क्लास ऑफ ८३' या हिंदी चित्रपटातही त्याने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'डिलिव्हरी बॉय' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT